suvichar

मसालेदार पालक फिश

वेबदुनिया
साहित्य: 500 ग्रॅम मासे, 1 कांदा चिरलेला, 1 टोमॅटो चिरलेला, 1 इंच आल्याचा तुकडा, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 चमचा हळद, 1/2 चमचा मसाला, 2 कप पालक, 1/2 चमचा धने पूड, 1 चमचा जिरे पूड, 1 चमचा लिंबाचा रस, थोडे हिंग, मीठ चवीनुसार, 1 मोठा चमचा तेल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. 

कृती: सर्वप्रथम मासे स्वच्छ धुऊन त्याचे छोटे छोटे काप करावे. एका कटोर्‍यात लिंबाचा रस, हळद आणि मीठ घेऊन त्यात माशांचे तुकडे घालावे व चांगल्याप्रकारे एकजीव करावे. हे मिश्रण 1 तास तसेच ठेवावे. पालकाला स्वच्‍छ धुऊन चिरून घ्यावे. कांदा-लसणाची पेस्ट तयार करावी. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, कांदा- लसणाची पेस्ट आणि हिरव्या मिरच्या घालून शिजू द्यावे. नंतर त्यात त्यात चिरलेला कांदा घालून परतून त्यात टोमॅटो आणि पालक घालून 2-3 मिनिट शिजवावे.

5 मिनिटानंतर त्यात गरम मसाला, जिरे-धने पूड घालून परतून घ्यावे. त्यात पाणी घालून 5-7 मिनिट शिजू द्यावे. नंतर त्यात माशांचे तुकडे व मीठ घालून शिजवावे. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

उन्हामुळे त्वचा काळवंडली आहे का? हे फेस मास्क घरीच बनवा

उन्हाळ्यात इम्युनिटी वाढवण्यासाठी काय खावे?

निरोगी राहण्यासाठी दर रोज फक्त 5 योगासने करा

नैतिक कथा : एका गरीब राजाची गोष्ट

कोणत्या पदार्थांत हिंग आवर्जून घालावा व कोणत्या घालू नये?

पुढील लेख
Show comments