Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चिऊताई दार उघड

Chiutai
Webdunia
शुक्रवार, 4 जून 2021 (17:02 IST)
दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !
 
दार असं लावून,
जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील?
आपलं मन आपणच खात बसशील ?
 
वारा आत यायलाच हवा!
मोकळा श्वास घ्यायलाच हवा !
 
दार उघड,
दार उघड,
चिऊताई चिऊताई, दार उघड !
 
फुलं जशी असतात,
तसे काटेही असतात.
सरळ मार्ग असतो,
तसे फाटेही असतात !
 
गाणा-या मैना असतात.
पांढरे शुभ्र बगळे असतात.
कधी कधी कर्कश्य काळे
कावळेच फ़क्त सगळे असतात .
 
कावळ्याचे डावपेच पक्के असतील.
त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील .
 
तरीसुद्धा या जगात वावरावंच लागतं.
आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं .
 
दार उघड
दार उघड चिऊताई,
चिऊताई दार उघड !
 
सगळंच कसं होणार
आपल्या मनासारखं?
आपलं सुद्धा आपल्याला
होत असतं परकं !
 
मोर धुंद नाचतो म्हणून
आपण का सुन्न व्हायचं?
कोकीळ सुंदर गातो म्हणून
आपण का खिन्न व्हायचं ?
 
तुलना करित बसायचं नसतं गं
प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं !
 
प्रत्येकाच्या आत
फुलणारं फूल असतं.
प्रत्येकाच्या आत
खेळणारं मूल असतं !
 
फुलणा-या फुलासाठी,
खेळणा-या मुलासाठी ,
 
दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !
 
निराशेच्या पोकळीमध्ये
काहीसुद्धा घडत नाही.
आपलं दार बंद म्हणून
कुणाचंच अडत नाही !
 
आपणच आपला मग
द्वेष करू लागतो
आपल्याच अंधाराने
आपलं मन भरू लागतो
 
पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं.
तुला शोधित फुलपाखरु नाचत आलं .
 
चिऊताई चिऊताई
तुला काहीच कळलं नाही .
 
तुझं दार बंद होतं.
डोळे असून अंध होतं .
 
बंद घरात बसून कसं चालेल?
जगावरती रुसून कसं चालेल ?
 
दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !
 
– मंगेश पाडगावकर
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात केसांना घाम येणे थांबवतील हे 5 घरगुती उपाय

रात्री झोपण्यापूर्वी ओव्याचे पाणी प्या, या आजारांपासून आराम मिळेल

उन्हाळ्यात असे शर्ट घाला जे ट्रेंडी दिसण्यासोबतच आरामदायी असतील

रिलेशनशिप आणि सिच्युएशनशिप म्हणजे काय त्यात काय अंतर आहे जाणून घ्या

पौराणिक कथा : नंदी भगवान शिवाचे वाहन कसे बनले

पुढील लेख
Show comments