suvichar

छोरी….

Webdunia
रविवार, 6 जून 2021 (10:01 IST)
थबकुनी थोडी
वळुनी पुढे घाईनें
प्रौढ नि बुटक्या झाडाजवळुन जास्वंदीच्या
जाते वाट पुढे ही शाळेपाशी
 
शाळा:
चौकॊनी खॊकेच ४ खिडक्यांचे
रंग सफेद चुन्याचा
छप्पर लाल नळ्यांचे…
 
भल्या पहाटे (आठ वाजता)
झाडांचीही नसते जेंव्हा झोप संपली
सुरु व्हायची शाळा …….
पहिली घंटा….
दुसरी घंटा……..
सुरु प्रार्थना आणि नंतर:
“नमन तुला गणराया
बुद्धी जाग्रुती देई मुलां या”
….एक जांभई.
 
कर्कष्य आवाजाने नंतर हुकुम व्हायचा:
“काढा पाट्या
कुठे उजळणी
चला दाखवा…..”
 
…माझी पाटी कोरी…
हात पुढे….
भिंगे खवचट चष्म्याची रोखुनिया बघती
वेत सपासप माझ्या हातांवरती…
 
किती वेळ रडलो नाही ठाऊक
आली अवचीत जाग स्पर्शता हात मऊ
मी पाहिले शेजारी;
 
नविन कोणी मुलगी
केस भुरे सोनेरी
निळसर डोळे…….
 
मी विचारले तिज, “नांव काय तुझे….”
ती खट्याळ हसली आणि म्हणाली
“नांव? छोरी ….हात पुढे कर.”
आणि नजर खॊडकर
आणिक माझ्या हातावरती …दुखर्या हातावरती .
चिमणिच्या नाजुक दातांनी तोडियली
फोड एक कैरीची….
 
फोड एक कैरीची;
अजुन ताजी
जिभेवर जिची आंबट गोडी,
भुरभुरती सोनेरी कुंतल,
 
अजुन घेते टिपुनी वेदना
नजर तिची ती निळी खॊडकर…..
गिरकी घेते मनीं कलाबुत तिच्या स्वरांची;
“नांव? छोरी…. हात पुढे कर”
 
– मंगेश पाडगांवकर
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी आणि मऊ बनवण्यासाठी घरगुती उपायांबद्दल जाणून घ्या

कडक उन्हात उसाचा रस ठरतो अमृत! जाणून घ्या त्याचे जबरदस्त फायदे

मुलांशी मैत्रीपूर्ण नाते कसे निर्माण कराल? जाणून घ्या या सोप्या Parenting Tips

अकबर-बिरबलची कहाणी : महागडा सुगंध

मुले पालकांच्या या सवयी आयुष्यभर विसरत नाहीत; प्रत्येक पालकाला त्या माहित असायला हव्यात

पुढील लेख
Show comments