Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठी कविता : मन असें आरसा आपला

woman
Webdunia
मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (15:27 IST)
खरं आहे हे की मन असें आरसा आपला,
जो जसा आहे तसाच त्यात दिसला,
खोटं मनाशी बोलणं शक्य तरी आहे का?
लपवून ठेवणं त्यापासून संभव होईल का?
जे काही चांगलं वाईट हातून घडतं,
खरी साक्ष त्याची फक्त तेच ठेवतं,
समजवत ते आपल्याला क्षणो क्षणी,
जरी आपल्याला पाहत नसेलही कुणी,
खोटं कित्तीही बोललो निधड्या छातीने,
कचरत मन त्यावेळी अनामिक भीतीने.
पण चेहेरा असतो ना वेगवेगळे रंग दाखवायला,
मनाचा सच्चेपणा बेमालूमपणे लपवायला!
तुम्हीच ठरवा मंडळी, चांगलं काय ते
की आपल्या च मनानी, आपल्या ला खायचं ते!!
...अश्विनी थत्ते

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

Summer special Recipe पान कुल्फी

लॅपटॉपवर काम करून थकलेल्या डोळ्यांना द्या विश्रांती, या टिप्स जाणून घ्या

Career in fire engineering: फायर इंजिनिअरिंग अभ्यासक्रम मध्ये कॅरिअर

त्वचेचा रंग उजळण्यासाठी हे प्रभावी घरगुती उपाय

डाएटिंग शिवाय वजन कसे कमी करावे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments