Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आला पह्यला पाऊस

Webdunia
सोमवार, 21 जून 2021 (16:01 IST)
आला पह्यला पाऊस
शिपडली भुई सारी
धरत्रीचा परमय
माझं मन गेलं भरी
आला पाऊस पाऊस

आतां सरीवर सरी
शेतं शिवारं भिजले
नदी नाले गेले भरी
आला पाऊस पाऊस

आतां धूमधडाख्यानं
घरं लागले गयाले
खारी गेली वाहीसन
आला पाऊस पाऊस

आला लल्‌करी ठोकत
पोरं निंघाले भिजत
दारीं चिल्लाया मारत
आला पाऊस पाऊस

गडगडाट करत
धडधड करे छाती
पोरं दडाले घरांत
आतां उगूं दे रे शेतं
आला पाऊस पाऊस

वर्‍हे येऊं दे रे रोपं
आतां फिटली हाऊस
येतां पाऊस पाऊस

पावसाची लागे झडी
आतां खा रे वडे भजे
घरांमधी बसा दडी
देवा, पाऊस पाऊस
तुझ्या डोयांतले आंस
दैवा, तुझा रे हारास
जीवा, तुझी रे मिरास
 
कवयित्री – बहिणाबाई चौधरी
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

गोमुखासनाचे फायदे जाणून घ्या

तेनालीराम कहाणी : म्हातारा भिकारी आणि राजा कृष्णदेवरायाची उदारता

ब्रेकफास्ट मध्ये बनवा पौष्टिक पोहे जाणून घ्या रेसिपी

थंडी विशेष : गाजर पराठा रेसिपी जाणून घ्या

हिवाळा येताच पाठदुखीचा त्रास वाढू लागला तर या 5 उपायांनी लगेच आराम मिळेल

पुढील लेख
Show comments