Dharma Sangrah

इतकेच मला जाताना

Webdunia
इतकेच मला जाताना सरणावर कळले होते-
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते !
 
ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही,
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते !
 
गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या,
पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते ?
 
मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी-
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते !
 
याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते
 
नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली-
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते !
 
घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली-
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते !
 
मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो-
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते !
 
- सुरेश भट

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

तेनालीराम कहाणी : घागरीतला महासागर

डिनरमध्ये बनवा Spicy Soya Chilli Recipe

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

MSRTC Vacancy एसटी महामंडळात १७,७४२ पदांची महाभरती: कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार प्राधान्य

पुढील लेख
Show comments