आपल्या लेखणीतून, नाटकातून, अभिनयातून, संगीतातून, मायबाप रसिक प्रेक्षकांचे निव्वळ मनोरंजन करणारा असा अवलिया होणे पुन्हा नाही. आणि असं हे धगधगते वादळ १२ जून २००० साली कायमचं शांत झालं. व आपल्या सर्वांचे लाडके भाई म्हणजेच पु ल देशपांडे हे स्वर्गातील देवांना हसवण्यासाठी कायमचे रुजू झाले.