rashifal-2026

सौंदर्य खुलविणारे नारळ

Webdunia
मंगळवार, 2 जुलै 2019 (12:41 IST)
सौंदर्याच्या दृष्टीकोनातून नारळाचे तेल फार उपयुक्त आहे. नारळाचे पाणी, ओल्या नारळाचा खोवलेला कीस, नारळाचे दूध, सुके खोबरे, नारळाचे तेल, नारळाची कवटी हे सारे सौंदर्यवृद्धीसाठी फार महत्त्वाचे आहेत. त्याचा उपयोग करून अनेक नामांकित तारकाही आपली त्वचा तजेलदार ठेवतात. 
 
नारळात आहे तरी काय ?
नारळामध्ये विविध एन्झाइम्स असतात. यात प्रामुख्याने एन्झाईम इन्व्हेस्टीन, ऑक्सिडेज आणि कॅटॅलेज यांचा समावेश करता येईल. या शिवाय ओल्या नारळाच्या गरामध्ये प्रथिने, तेल आणि इतर काही इनऑर्गेनिक तत्व असतात.
नारळाच्या दूधामध्ये मॅनिटॉल नावाची साखर, डिंक, अल्ब्युमिन नावाची प्रथिने, टार्टारिक एसिड आणि पाणी असते. 
नारळाच्या तेलामधे कॅप्रॉलिक एसिडशिवाय लॉरिक, मायरिस्टीक, पामिटिक, आणि स्टीयरिक आम्लाचे ग्लिसराईड्‍स असतात.
नारळाचे पाणी
नारळाच्या पाण्याविषयी एक अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे गर्भधारणेनंतर आठवड्यातून दोन-तीन वेळा नारळाचे पाणी नियमित ‍प्यायल्यास बाळाची कांती सुधारते आणि बाळाच रंग उजळतो. ओले तसेच सुखे खोबरे शांती देणारे, कामशक्ती वाढवणारे, पोट साफ होण्यास मदत करणारे, अर्थात बद्धकोष्ठाचा नाश करणारे आहे. शिवाय टॉनिक म्हणूनही ते उपयुक्त आहे. त्वचेचे आरोग्य त्यामुळे सुधारते. 
केसांसाठी नारळ
केस तसेच सौंदर्यवर्धनासाठी नारळाचे पाणी अतिशय उपयुक्त आहे. केस धुण्यापूर्वी साधारण एक तास आधी नारळाचे पाणी केसांना आणि टाळूला चोळून लावावे. यामुळे केस मुलायम तर होतातच, शिवाय केसांच्या मुळांचे पोषण होऊन केस गळण्याचे प्रमाण कमी होते आणि केसांची वाढ व्हायला लागते.
 
याशिवाय, त्वचा निर्मळ आणि नितळ राखण्यासाठीही नारळाच्या पाण्याचा उपयोग करता येतो. नारळाचे पाणी अतिशय पोषक आहे व ते त्वचेत शोषले गेल्यामुळे त्वचेला टवटवीतपणा येतो. याचसाठी निस्तेज आणि कोरडी त्वचा असलेल्यांनी नारळाच्या पाण्यामधे दुधावरील थोडी साय मिसळून त्याने त्वचेला हळुवार हाताने मसाज करावा. 
याशिवाय नारळाचे पा‍णी व दूध त्वचेच्या क्लिझिंगसाठीही उपयुक्त ठरतात. 
नारळाचे दूध
कोरड्या त्वचेचे पोषण करण्यासाठी नारळाचे दूध सर्वोत्तम ठरते. कोरडेपणामुळे जेव्हा त्वचा काळवंडलेली, निस्तेज आणि रखरखीत वाटायला लागते तेव्हा नियमित नारळाच्या दूधाने चेहर्‍याला मसाज केला तर, त्वचा पुन्हा स्निग्ध तुकतुकीत आणि आभायुक्त दिसायला लागते. खरे पाहता त्वचेसाठी नारळाचे दूध म्हणजे एक वरदानच आहे.
या व्यतिरिक्त फेशियल मसाज करताना देखील नारळाचे दूध क्रीममध्ये मिसळून वापरावे. असे केल्याने त्वचेवरील सुरकुत्यांचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. 
 
त्वचेप्रमाणे डोक्यावरील केसांसाठीही नारळाचे दूध अतिशय पोषक आणि गुणकारी ठरते. टाळूची त्वचा आणि केस वाढत नसल्यास नारळाच्या दुधाचा उपयोग उपकारक ठरेल. नारळाच्या दुधामध्ये व्हिटॅमिन ई ची गोळी फोडून घालावी व मिश्रणाने टाळूला हलक्या हाताने मसाज करावा. असे आठवड्यातून किमान दोनदा करावे. या प्रयोगाने निश्चितच केसांचे आणि टाळूच्या त्वचेचे आरोग्य सुधारेल.
नारळाचे तेल
आयुर्वेदानुसार नारळाचे तेल 'केश्य', अर्थात केसांचे आरोग्य वाढवणारे, केस गळणे थांबवणारे आणि केसांची वाढ करणारे आहे. बाजारात उपलब्ध असलेले नारळाचे तेल सुक्या खोबर्‍यापासून काढले जाते. मात्र अयुर्वेदात नारळाचे तेल तयार करण्याची कृती पूर्णपणे वेगळी आहे. नारळाचे तेल ओल्या खोबर्‍यापासून तयार केले जाते. असे तेल तयार करण्यासाठी ओला नारळ बारीक वाटून घ्यावा आणि त्यापासून दूध काढून घ्यावे. हे दूध मंद आचेवर उकळत ठेवावे. यामुळे यातील पाण्याचा अंश उडून जाईल आणि निव्वळ तेल मागे उरेल. हे तेल गाळून घ्यावे. अशा पद्धतीने तयार केलेले तेल वापरल्यामुळे केस गळायचे थांबतात व केसांची वाढ व्हायला लागते.
 
केसांबरोबरच नारळाचे तेल त्वचेसाठीही उपयुक्त आहे. कोरड्या पडलेल्या अंगाला नारळाच्या तेलाने मसाज करावा. नारळाच्या तेलाचा वास उग्र वाटत असल्यास त्यात लव्हेंडर ऑईल आणि जिरेनियम ऑईलचे 4-5 थेंब मिसळून घ्यावेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

मुरुमांचे डाग काढण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

हे पदार्थ कर्करोगास कारणीभूत आहे, सेवन करणे टाळा

हिवाळ्यात सूर्यनमस्कार करण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

तेनालीराम कहाणी : काळाचे चक्र

झटपट बनवा स्वादिष्ट अशी Corn Avocado Deviled Eggs Recipe

पुढील लेख
Show comments