rashifal-2026

बेडशीट्‌स खरेदी करताना...

Webdunia
शनिवार, 14 डिसेंबर 2019 (15:03 IST)
पूर्ण दिवस ऑफिस आणि घरातलं का करून दमल्यावर तुम्हाला गरज असते ती शांततापूर्ण आरामाची. जो तुम्हाला मिळतो तुमच्या बेडरूममध्ये. जिथे दिवसभराच्या थकव्यानंतर बेडवर पाठ टेकवल्यावर डोळे मिटून पडलं की, बरं वाटतं. आपल्या बेडरूममधील प्रत्येक वस्तू आपणआपल्या कंफर्टप्रमाणे ठेवत असतो. पण यात व्यत्यय येऊ शकतो जर तुमची बेडशीट योग्य नसेल. त्यामुळे बेडशीटची निवड नेहमी विचारपूर्वक केली पाहिजे.
कारण आपण बेडवर दिवसभरातील अनेक तास घालवतो. त्यामुळे बेडशीटही ऊत्तम आणि कंफर्टेबल असणं आवश्यक आहे. म्हणूनच या लेखात आम्ही तुम्हाला देत आहोत बेडशीट खरेदीबाबतच्या काही टिप्स :  
 
ऋतू आणि आपल्या आवडीनुसार तुम्ही बेडशीटची निवड करा. कारण जी बेडशीट दुसर्‍यांच्या घरी चांगली दिसते, तिच तुमच्याकडेही सूट होईलच असं नाही. कारण प्रत्येक घराची रचना, रंग आणि लोकांची आवडही वेगळी असते. उन्हाळ्याच्या दिवसात कॉटन बेडशीट्‌सची निवड योग्य आहे तर थंडीच्या दिवसात तुम्ही सिल्क, सॅटीन किंवा लिननसारख्या बेडशीट्‌सचा वापर करू शकता. 
ज्या बेडशीट्‌स रोज वापरायच्या असतील त्या रिंकल फ्री असतील याची काळजी घ्या. कारण रोजच्या वापरासाठी रिंकल फ्री बेडशीट घेणं कधीही चांगलं आणि त्या सहज धुताही येतात. 
 
जेव्हा तुम्ही कॉटन बेडशीट्‌स खरेदी करता तेव्हा त्याच्या साईजकडेही विशेष लक्ष द्या. कारण कधी कधी धुतल्यानंतर चादरी आटतात. त्यामुळे चादर खोचणंही कठीण होतं. त्यामुळे बेडशीट्‌स खरेदी करताना माप आणि फॅब्रिकची निवड योग्य करा. जी बेडशीट तुम्हाला नीट खोचता येईल. आजकाल कॉटन बेडशीट्‌समध्येही खूप व्हरायटी मिळते. जसं प्युअर कॉटन, मिक्स कॉटन, नॉन-रिंकल कॉटन, हँडलूम कॉटन इ. 
बेडरूमला सुंदर बनवण्यासाठी आणि लक्झरी लूक देण्यासाठी रंगसंगतीचं कॉर्डिनेशनही महत्त्वाचं आहे. खोलीतील स्टाईल आणि रंग लक्षात ठेवून बेडशीट्‌स खरेदी करा. काही जण बेडशीट्‌स खरेदी करताना रंगसंगतीकडे लक्ष देत नाहीत. हे जर इतकं महत्त्वाचं नसलं तरी बेडशीट आणि कलर कॉर्डिनेशनमुळे तुमच्या बेडरूमच्या लूकमध्ये नक्कीच फरक पडतो.. कधी कधी खास समारंभाच्या निमित्ताने तुम्ही वेलवेट किंवा सिल्क बेडशीट्‌सचाही वापर करू शकता.
 
जसं लग्र, सणवार किंवा पार्टी असल्यास असे पर्याय तुम्ही वापरू शकता. यामुळे तुमच्या बेडरूमला नक्कीच क्लासी लूक मिळेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

डाळ भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे

बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बीटेक) इन ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग मध्ये करिअर बनवा

केसगळती रोखण्यासाठी हे हेअर पॅक लावा

श्री अक्षरावरुन मुलींची नावे

Christmas Special झटपट तयार होणाऱ्या स्नॅक आयडिया

पुढील लेख
Show comments