Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लॅपटॉप बराच काळ सुरक्षित राहील, या टिप्स अवलंबवा

Webdunia
मंगळवार, 25 जानेवारी 2022 (16:08 IST)
आजच्या काळात लॅपटॉप हा जवळपास प्रत्येक माणसाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. विशेषतः कोरोनाच्या काळात. विद्यार्थी असो की नोकरी करणारा, कोरोनाचा काळ असा झाला आहे की आता जवळपास प्रत्येकाकडे लॅपटॉप आहे. ऑनलाइन क्लास असो, ऑफिसचे काम असो किंवा घरून काम असो, आता सर्व काही लॅपटॉपवरून केले जात आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यासोबत कुठेही प्रवास करायला हरकत नाही. स्मार्टफोनप्रमाणेच आता प्रत्येकाकडे लॅपटॉप आहे. आपण ही लॅपटॉप वापरत असाल तर त्याची काळजी घेणंही खूप गरजेचं आहे. आपण ते स्वतः विकत घेतले असेल किंवा ऑफिसमधून आणले असेल. आज आम्ही काही अशा टिप्स सांगत आहोत, ज्यांना अवलंबवून आपण  लॅपटॉपची काळजी घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया या उपयुक्त टिप्स... 
 
लॅपटॉपची अशी काळजी घ्या 
 
1 काम झाल्यावर बंद करा - लॅपटॉपला स्लीप मोडमध्ये ठेवणे सोयीचे असते, परंतु दीर्घकाळ स्लीप मोडमध्ये ठेवणे चांगले नाही. अशा स्थितीत काम संपले की लॅपटॉप त्वरितच बंद करा.
 
2 बॅटरीला विश्रांती द्या  -तज्ज्ञांच्या मते, बॅटरी चार्ज 80 टक्क्यांच्या वर आणि 40 टक्क्यांच्या खाली जाऊ देऊ नका. असे केल्याने बॅटरीचे आयुष्य चारपट जास्त होऊ शकते. 
 
3 थंड ठेवा-  लॅपटॉप थंड ठेवणे बॅटरीसाठी महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा कूलिंग एअरफ्लो योग्य स्थितीत काम करत राहतो. जेव्हा हवामान गरम असते तेव्हा त्याकडे लक्ष देणे अधिक महत्वाचे होते.
 
4 वेळोवेळी अपडेट करत रहा - लॅपटॉपचे सॉफ्टवेअर अपडेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सॉफ्टवेअर अपडेट्स करणे आपल्या लॅपटॉपला काही सुरक्षा जोखमींपासून संरक्षित करण्यात मदत करतात, तसेच बग्स आणि इतर किरकोळ समस्यांचे निराकरण करण्यात मदत करतात.
 
 

संबंधित माहिती

Badminton Ranking: सात्विक-चिराग जोडी जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी

या खेळाडूने व्यक्त केली मुख्य प्रशिक्षक बनण्याची इच्छा म्हणाले -

Pune Hit and Run Case : राज्य शुल्क विभागाकडून पुण्यातील कोझी बार आणि ब्लॅक पब सील

SRH vs KKR : कोलकाताने हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी सांगितले

Beauty Tips : कोको पावडर फेसपॅकने चेहरा होईल चमकदार

रेडियोलॉजिस्ट मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

उन्हाळ्यात डिनरमध्ये खा या भाज्या, शरीर आरोग्यदायी राहील

केळीचे रायते तुम्ही कधी ट्राय केले का? तर चला लिहून घ्या रेसिपी

तुम्ही कधी वॉटर एप्पल खाल्ले आहे का? शरीराला मिळतात फायदे

पुढील लेख
Show comments