Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जुन्या कपड्यांचा पुनर्वापर

Webdunia
मंगळवार, 12 मार्च 2019 (14:38 IST)
हल्लीच्या काळात एका व्यक्तीमागे कपाट भरभरून कपडे असतात. कधी कोणी प्रेमाने घेतलेले, लग्नकार्यात मिळालेले आणि आपणच हौसेने घेतलेले कपडे अशी कपड्यांची भाऊगर्दी असते. त्यामुळे एक नूर आदमी दस नूर कपडा अशी एक म्हण आपल्याकडे सांगितली जाते. ती तंतोतंत लागू पडते. कपाटातील बरेचसे कपडे खूपदा वापरल्यामुळे त्यांचा कंटाळा येतो. पण तरीही आठवणींमुळे किंवा आवडले म्हणूनही ते टाकले जात नाहीत. ते गाठोड्यात पडून राहतात; मात्र थोडी कल्पकता दाखवून, कलाकुसर करून अशा कपड्यांचा पुनर्वापर करता येतो.
 
शर्ट किंवा कुर्त्यापासून बनवा उशीचे कव्हर वापराविना पडून असलेले शर्ट किंवा कुर्ते उशीच्या आकारात कापा. त्यापासून खोळ बनवता येईल. तसेच उशीच्या आकाराचे काप करून त्यात कापूस भरून नव्या उशाही बनवता येतील. याध्ये फाटलेल्या पण चांगल्या सुती कपड्यांचे तुकडेही भरता येतात.
 
टेबल कव्हर- उत्तम कलाकुसर केलेल्या कपड्यांपासून खुर्च्यांसाठी कव्हर तयार केले तर ते देखणे दिसते. त्याशिवाय लेस किंवा फ्रिल काढून टेबलच्या कव्हरला, पडद्यांना लावता येतात. मुलांच्या कपड्यांवर काही वेळा कार्टूनचे पॅच असतात तेही टेबल कव्हर किंवा बेडच्या कव्हर लावून त्यांचा सुंदर पुनर्वापर करता येतो. काही कपड्यांवर देखणी कलाकुसर केलेली असते. काहींना लेस, फ्रिल्स लावलेल्या असतात. हे पुन्हा वापरात आणून छान काही तरी करू शकतो.
 
बॅग जुन्या जीन्स किंवा कार्गो पँट या खूप दिवस वापरूनही फाटत नाहीत. काही वेळा रंग उतरतो. त्याही न फेकता कपाटाच्या तळाशी ठेवलेल्या असतात. या पँटचा खिशापर्यंतचा भाग कापून वेगळा करा. वरच्या भागाच्या तळाशी व्यवस्थित टीप मारा. मग या पँटची छोटी शॉर्टस्‌ होईल किंवा वरच्या भागाला चेन लावून घेतलीत तर चांगली बॅगही होऊ शकते. तशाच प्रकारे जीन्सच्या स्कर्टचीही बॅग तयार करता येईल.
 
अन्य उपयोग
* जुन्या कपड्यांतील होजिअरीच्या टीशर्टनी स्वच्छता करता येते. विशेषतः काच साफ करताना मऊ झालेला टीशर्टवापरला तर काचेवर ओरखडे उठत नाहीत.
 
* कपड्यांवरील मोठ्या आरेखनापासून आपण फ्रेम बनवू शकतो.
 
* साडीपासून पंजाबी ड्रेस किंवा कुडता किंवा मॅक्सी गाऊनही तयार करु शकतो.
 
* प्रिंटेड कपड्यापासून लॅम्प शेड बनवू शकतो.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments