Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'घर' सगळं ऐकतं आणि सांगतंही

Webdunia
मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (15:49 IST)
एखाद्याच्या घरात प्रवेश केल्यावर तुम्हाला कधी विचित्र नकारात्मक फिलिंग आली आहे का? किंवा एखाद्याच्या घरात प्रवेश करताच तुम्हाला शांतता आणि सकारात्मकतेची भावना आली असेल.
 
नकारात्मकत जाणवत असलेल्या घरांमध्ये दररोज भांडणे, मारामारी इत्यादी होत असतात किंवा कुटुंबात सामंजस्य आणि प्रेमाचा अभाव असतो. तिथे काही क्षणातच एक विचित्र अस्वस्थता सुरू होते...त्याचबरोबर काही घरे इतकी प्रसन्न वाटतात की तासन्तास तिथे बसूनही वेळ कळत नाही.
 
असे म्हणतात की घराच्या भिंती सर्व ऐकतात आणि सर्व शोषून घेतात. घराच्या भिंती सकारात्मकतेबरोबरच नकारात्मकताही ठेवतात...
 
'कोपभवन' हे नाव आपल्या जुन्या आख्यायिकांमध्ये अनेकदा ऐकायला मिळते, खरे तर 'कोपभवन' हा पौराणिक कथांमध्ये सांगितलेला घराचा भाग होता जिथे बसून भांडणे, वाद वगैरे मिटवले जात होते.
 
 त्याकाळीही आपले पूर्वज सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेचा प्रवाह वेगवेगळा ठेवण्याचा प्रयत्न करत असत, म्हणून 'कोपभवन' सारखी व्यवस्था केली गेली जेणेकरून संपूर्ण घर नकारात्मकतेपासून सुरक्षित राहील.
 
अशात घर हे ‘विवादाचे घर’ किंवा ‘कोपभवन’ होऊ नये यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. सुंदर चित्रे, फुले, झाडे, बागा, सुंदर कलात्मक वस्तू इत्यादी निःसंशयपणे घराची सजावट आहेत. पण घरातील स्त्रिया आणि पुरुषांच्या सामर्थ्याने घर हसत-खेळत, लहान मुलांची हौस-खोखे आणि मोठ्यांच्या समाधानाने श्वास घेते...
 
त्यांना आदराने जतन करून आणि आपल्या घराच्या भिंती निरोगी ठेवण्याचा सदैव प्रयत्न करत, संपूर्ण घर आणि घरात येणारी माणसे सदैव हसतमुखाने वावरत असतात. कारण 'घर' सगळं ऐकतं आणि सांगतंही....

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

सर्वांना आवडेल अशी झटपट मुगाच्या डाळीची चकली

Conceive Quickly गर्भधारणा करायची असेल तर संबंध ठेवल्यानंतर किती पडून राहणे आवश्यक जाणून घ्या

Winter Special Recipe: गाजर हलवा

व्यावसायिक पायलट होण्यासाठी प्रक्रिया जाणून घ्या

या फळात आहे पुरुषांच्या 5 समस्यांवर उपाय, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments