Dharma Sangrah

खर्‍या प्रेमाचे ओझे वाटत नाही

Webdunia
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (17:49 IST)
एका सरळसोट, अरुंद डोंगरातून जाणारी पायवाट होती. दुपारी 12 वाजले होते. रणरणत्या उन्हाने बेजार केले होते. एक साधू या मार्गावरून तीर्थयात्रा करत डोंगरावरील देवीला जात होता. त्याच्या जवळ दोन शाली, दोन उपरणी, दोन पंचे आणि एक कमंडलू, एवढंच सामान होतं. पण रस्त्याच्या चढणीमुळे त्याला एवढं सामान ओझं वाटत होतं आणि घामाच्या धारा त्याच्या अंगावरून वाहात होत्या. 
 
थोडं पुढं गेल्यावर त्याला एक 70 वर्षाची आदिवासी महिला 8 वर्षाच्या झाडावरून पडून पाय मोडलेल्या मुलाला, वैद्यकीय उपचारासाठी पाठीवर घेऊन येत होती, असे दिसले. तो मुलगा धष्टपुष्ट होता. ती वृद्धा मोठय़ा उत्साहान तो सरळसोट उतरणीचा रस्ता उतरत होती.
 
साधूने त्या महिलेला विचारलं, ‘आजी, इतकं ओझं घेऊन या वयाला तुम्ही हा उतरणीचा रस्ता कसा उतरता? मी तर एवढय़ाशा ओझ्यानं हैराण झालो आहे.’ त्या वृद्धेनं साधूला नीट निरखून पाहिलं आणि म्हणाली, ‘महाराज, ओझं आपण वाहात आहात, हा तर माझा नातू आहे!’
 
तात्पर्य : खर्‍या प्रेमाने केलेल्या गोष्टीचे ओझे वाटत नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

उष्माघाताच्या वेळी हे फळ खाल्ल्याने लवकर बरे होण्यास मदत होते आणि आराम मिळतो

Career in Aviationr Industry : एविएशन इंडस्ट्री मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

उन्हाळ्यात त्वचेचे संरक्षण करण्यासाठी बाहेर जाण्यापूर्वी या गोष्टी तुमच्या बॅगमध्ये ठेवा

उष्माघातापासून त्वरित आराम मिळवण्यासाठी हे ७ सोपे घरगुती उपाय करून पहा

Kitchen Tips पनीर तळताना तव्याला चिकटते का? या सोप्या युक्त्या वापरून पहा

पुढील लेख
Show comments