असं म्हणतात की अक्षय तृतीयेला भगवान विष्णू यांना सातूच्या लाडवाचा नैवेद्य दिला की ते प्रसन्न होतात.सातू हे उन्हाळ्याच्या हंगामात शरीराला थंडावा देखील देतो.पौष्टीक असे हे सातूचे लाडू आरोग्यवर्धक आणि पौष्टीक असतात. चला तर मग हे लाडू बनवायचे साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
एका परातीत सातूचे पीठ चाळून घ्या.साजूक तूप वितळवून घ्या आणि सातूच्या पिठात तूप,वेलची पूड,पिठीसाखर घाला हे मिश्रण एक सारखे मिक्स करा. या मध्ये सुखे मेवे घाला आणि गोल लाडू बांधा. नैवेद्य म्हणून देवाला द्या.
टीप - आपली इच्छा असल्यास प्रत्येक लाडवावर एक-एक बदाम देखील लावू शकता.