Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फक्त 10 मिनिटात तयार होते चविष्ट, मलाईदार पोहे खीर, लिहून घ्या रेसिपी

Webdunia
गुरूवार, 27 जून 2024 (07:00 IST)
पोहे हा पदार्थ सर्वांना आवडतो. कारण पोहे ही एक साधी सोप्पी रेसिपी आहे. भारतात वेगवेगळ्या पद्धतीने पोहे बनवले जातात. तर आज आम्ही तुम्हाला पोह्यांबद्दल एक गोड रेसिपी सांगणार आहोत. ती रेसिपी म्हणजे पोहे खीर. पोहे खीर ही रेसिपी जेवढी चविष्ट आहे तेवढीच ती बनवणे सोप्पी आहे. तर चला लिहून घ्या रेसिपी मलाईदार पोहे खीर. 
 
साहित्य-
एक कप पोहे 
शुद्ध तूप 
चार कप दूध 
काजू 
किशमिश 
साखर 
वेलची पूड 
गुलाबाच्या पाकळ्या 
 
कृती-
एका पॅनमध्ये दोन मोठे चमचे तूप घालावे. त्यामध्ये काजु आणि किशमिश भाजून घ्यावे. याच पॅनमध्ये पोहे घालावे आता यामध्ये दूध घालून शिजण्यासाठी ठेवावे. व साखर घालावी. कमीतकमी 5 मिनिट शिजवावे. थोड्या वेळाने दिसेल की. खीर घट्ट होत आहे. मग यामध्ये वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स घालावे. व त्यावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवाव्या म्हणजे सुंदर दिसेल तर चला तयार आहे आपली मलाईदार पोहे खीर, जी थंड करून सर्व्ह करावी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फोनपे वापरकर्त्याची 5 लाख रुपायांची फसवणूक, आरोपींना अटक

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटींमुळे विधवा आणि निराधार महिलांना लाभ मिळणार नाही?

राहुल गांधी यांच्या 'हिंदू' संदर्भातील विधानावरुन गदारोळ, पंतप्रधान मोदी आणि शाह काय म्हणाले?

हिंदू समाजाला हिंसक म्हटल्या प्रकरणात राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागावी- देवेंद्र फडणवीस

मानहानीच्या खटल्यात मेधा पाटकर यांना 5 महिन्यांचा तुरुंगवास

सर्व पहा

नवीन

पीएचडी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये करिअर करा

पावसाळ्यात उडणाऱ्या कीटकांपासून मुक्त होण्याचे काही सोपे उपाय अवलंबवा

नेहमी आकर्षक दिसण्यासाठी कमी उंचीच्या मुलींनी असे कपडे घालावेत

ओ अक्षरावरून मुलींची मराठी नावे,O Varun Mulinchi Nave

पावसाळ्यात स्वयंपाकघरात कीटकांचा प्रादुर्भाव असल्यास या टिप्स अवलंबवा

पुढील लेख
Show comments