फ्रूट्स आपली चव आणि हेल्थ बेनेफिट्स करीत ओळखले जातात. हे आपल्या आरोग्याला पोषक तत्वे प्रदान करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन, खनिज, फायबर हे शरीराला शक्ती प्रदान करतात. काही जणांना ड्रायफ्रूट्स सहसा आवडत नाही खासकरून लहान मुले खाण्याचा कंटाळा करतात. तुमच्या देखील मुलांना फ्रुट्स खायला आवडत नसेल तर त्यांना फ्रूट अँड नट्स बर्फी बनवून खाऊ घाला. नक्कीच ते आवडीने खातील. तर चला जाणून घ्या रेसिपी.
साहित्य-
मखाणे 1 वाटी
डिंक 3 चमचे
काजू 1 वाटी
बदाम 1 वाटी
खरबूज बिया 1 चमचा
पिस्ता 1 चमचा
तूप 1 चमचा
वेलची 1 चमचा
साखर1 कप
केशर
नारळ किस 1 कप
कृती-
बर्फी बनवण्यासाठी सर्वात आधी ताटलीला थोडं तूप लावून बाजूला ठेवा. नंतर एका कढईत 5 चमचे तूप गरम करून त्यामध्ये काजू, बदाम, डिंक आणि मखाणे तळून घ्यावे. व ताटलीत काढावे. आता पॅनमध्ये नारळाचा किस परतून घ्या. नंतर गॅस बंद करून नारळाचे मिश्रण वेगळे करावे .
आता तळलेले काजू, बदाम आणि सर्व साहित्य एकत्र करून बारीक करावे. नंतर मध्यम आचेवर दुसऱ्या पॅनमध्ये पाणी आणि साखर घालून साखरेचा पाक तयार करून घ्यावा. आता वेलची आणि केशर टाकून घालावे. नंतर संपूर्ण ड्रायफ्रूट मिश्रण पाकात घालावे.व चांगल्याप्रकारे मिक्स करावे. आता हे मिश्रण तूप लावलेल्या ताटलीत काढावे. मिश्रण थंड झाल्यावर सुरीच्या मदतीने याच्या वड्या कापून घ्या. तर चला तयार आहे आपली फ्रूट अँड नट्स बर्फी. लहान मुलांना देखील आवडेल.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.