Janmashtami 2024 संपूर्ण भारतात साजरा केला जाणार आहे. यादिवशी भगवान श्रीकृष्णाला वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. धणे पंजीरी शिवाय तुम्ही पपई बर्फी, रोज कलाकंद, दूध पेढा यांचा देखील नैवेद्य दाखवू शकतात. तर चला जाणून घ्या रेसिपी.
1. दूध पेढा-
एका कढईमध्ये दूध घालून उकळण्यासाठी ठेऊन द्यावे. आपण ढवळत असलेले दूध घट्ट होताना दिसेल तेव्हा यामध्ये 1/2 कप साखर आणि 1/2 चमचा वेलची पूड मिक्स करा. यानंतर लहान गॅस वर पाच मिनिट ठेवावे. तोपर्यंत जोपर्यंत दूध आटत नाही. आता आटलेले दूध एका प्लेट मध्ये काढून घ्या. थंड झाल्यानंर हाताला तूप लावून आकार देऊन पेढे बनवावे.
2. रोज कलाकंद-
एका पॅनमध्ये एक लिटर दूध गरम करावे. सोबत यामध्ये 100 मिली मिल्कमेड मिक्स करावे. दुधाला मिडीयम गॅस वर ठेऊन आटवावे. आता पनीर किसून यामध्ये दूध घालावे. व हलक्या हातांनी मिक्स करावे.
आता यामध्ये 1/4 कप रोज सिरप टाकून मिक्स करावे. मग छोटा चमचा वेलची पूड घालावी. दूध घट्ट होइसपर्यंत आटू द्यावे. एका ट्रे ला तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण घालावे. याला चांदीचे वर्क लावावे व पिस्ता काप ने सजवावे. व आवडेल त्या आकारात कापून घ्यावे.
पपई बर्फी-
पिकलेली पपई सोलून तिचे तुकडे करून घ्या. काही तुकडे सोडून बाकी सर्व मिक्सरमधून फिरवून घ्यावे.
एका पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करावे. पपईची प्युरी आणि तुकडे यामध्ये टाकून शिजवून घ्यावे. तोपर्यंत जोपर्यंत यामधील पाणी आटत नाही. आता 1/3 कप साखर मिक्स करून शिजवावे. साखरेमधील पाणी कमी झाल्यानंतर यामध्ये 1/2 कप मिल्क पाउडर मिक्स करावी. थोड्या वेळाने गॅस बंद करावा. एक ट्रे मध्ये तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण घालावे. तसेच ड्राय फ्रूट्स टाकून रूम टेंपरेचर वर दोन तास सेट होण्यासाठी ठेवावे. मग तुम्हाला आवडेल त्या आकारात कापावे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.