Dharma Sangrah

वास्तुप्रमाणे दगडी घराचा जीवनावर प्रतिकुल प्रभाव!

Webdunia
सोमवार, 6 ऑगस्ट 2018 (00:46 IST)
पूर्वी मातीची घरे असायची. दगड, माती व लाकूड यांचा वापर करून घरे बांधली जात होती. परंतु, आता आधुनिक काळात विटा, सिमेंट, चुना व आसारीचा वापर घर बांधणीत केला जातो. दगडी ठोकळे एकावर एक ठेवून घरे बांधली जात असत. दगडाच्या घराचा आपल्या जीवनावर प्रतिकूल प्रभाव पडत असतो. कसा तो पहा. 
 
1. घरासमोर दगडी खांब असेल तर त्या घरातील मुख्य व्यक्ती भांडणप्रिय असते. ही व्यक्ती कुणाशीही वाद घालण्यात अग्रेसर भूमिका घेत असते. 
 
2. घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एखादा मोठ्या आकाराचा दगड असेल तर त्या घरात नेहमी वाद होतात. घरातील सदस्य एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात. काही वेळा तर अशी वेळ येते की, त्या घरात नवरा बायको यांच्यात झालेले वाद विकोपाला जाऊन त्याच्यात काडीमोड होण्याची शक्यता असते. 
 
3. घरासमोर मुरूमाची टेकडी‍ किंवा दगडी जुनाट वास्तू असेल तर त्या घरातील मुख्य व्यक्ती व त्याची मुलांमध्ये नेहमी भितीचे वातावरण असते. त्या घरातील प्रत्येकाला अडचणींचा सामना करावा लागतो. 
 
4 घरासमोर, आजूबाजूला किंवा मागे पडलेली दगडी वास्तू असेल तर त्या घरात कोणत्याच बाजूने विकास होत नाही. मुलांच्या शिक्षणात बर्‍याच अडचणी येतात. 
 
5. दगडी पडक्या वास्तूच्या जवळ राहणार्‍याना तर अचडणी येतात तसेच त्याच्या आसपास राहणार्‍या नागरिकानाही मोठ्या अडचणीना तोंड द्यावे लागते. 
 
6 घरात नेहमी गरीबी नांदत असते. व्यवसाय व्यापारात यश मिळत नाही. तसेच नोकरीतही वाद उद्‍भवत असतात. 
 
7 काही घरात दगडाच्या कमानी उभ्या केलेल्या असतात. अशा घरात राहणार्‍या नागरिकांना मोठ्या अडचणींना समोरे जावे लागत असते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

Friday Upay for Daan शुक्रवारी हे दान करा आणि सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवा

वाईट दशाचा अंत: सुख आणि समृद्धी मिळविण्यासाठी दशामातेचे व्रत करा, उपासनेची पद्धत जाणून घ्या

Guruvar Vrat Katha: गुरुवारी ही व्रत कथा नक्की वाचा, कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही

आरती गुरुवारची

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments