Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वास्तुशास्त्राप्रमाणे कार्याचा मुहूर्त

Webdunia
तयार घरांचा वास्तुशोधनामध्ये ज्योतिषाचे विशेष महत्त्व आहे. तयार घरामधून वास्तू दोष शोधण्यासाठी मुख्य दरवाज्याची मांडणी, रंगाची निवड, दरवाजे खिडक्या यांच्यासाठी योग्य दिशेची निवड, त्यात कराव्या लागणार्‍या सुधारणांबरोबरच घरमालकाची जन्मपत्रिका, जन्म-नक्षत्र यांचेही विश्लेषण करायला हवे. फक्त घरात तोडफोड करून आणि वास्तुशास्त्राचे नियम पाळून योग्य परिणाम साधत नाही. त्यासाठी घरमालकाच्या पत्रिकेचाही विचार करावा लागतो.

वास्तुशास्त्रात मुहूर्ताचे महत्त्व : 
पूर्वीपासूनच मंगलकार्यासाठी योग्य मुहूर्ताचा विचार केला जातो, कारण मुहूर्ताचा प्रभाव सर्व स्थापत्य व पदार्थांवरही पडतो. ज्योतिष्याच्या पुस्तकात, मुहूर्त चिंतामणी, मुहूर्त मार्तंड, मुहूर्त गणपती तसेच अन्य वैदिक साहित्यात मुहूर्तासंबंधी माहिती मिळते. गर्भाधान, प्रतिष्ठापना, लग्न, मुंज, यात्रारंभ प्रवास, विद्यारंभ, गृहप्रवेश या आणि आणि अनेक चांगल्या कार्यासाठी मुहूर्त आवश्यक ठरतो.

मुहूर्त म्हणजे ज्या वेळेला जातक कार्य सुरू करतो ती वेळ. त्यावेळी नक्षत्र, ग्रह, दशा त्या कार्यसिद्धीसाठी अनुकूल हव्यात तसेच कोणतेही विघ्न न येता काम व्हावे तसेच त्याचे दूरगामी परिणामही चांगले व्हावेत.

वेळेचे पाच भाग असतात. वर्ष, महिना, दिवस, लग्न आणि मुहूर्त हे पाचही उत्तरोत्तर फलप्रद असतात चांगल्या वेळी या पाचांमधले दोष नाहीसे केले जातात.

माणसाच्या आयुष्यात घर बांधणे हे ही एक महत्त्वाचेच काम आहे स्थापत्यवेदात जमीन घेताना पाया खणताना, घर बांधायला सुरवात करताना, गृहप्रवेश वृक्षारोपण तसेच झाड तोडताना या सर्व वेळी मुहूर्ताचे निर्देश दिले आहेत.

जमीन घेताना : 
गुरुवार, शुक्रवार, प्रतिपदा, पंचमी, षष्ठी, एकादशी, पौर्णिमा ह्या तिथीला मृग मूळ, पूर्वा, आश्लेषा, मघा अनुराधा पुनर्वसू, अश्विनी, रेवती, विशाखा या नक्षत्रावर जमीन घेणे लाभदायक मानले जाते.

शिलान्यास किंवा पाया खणण्याच्या वेळी दिशा, मुहूर्त, देवालय, जलाशय (तलाव) आणि घर बांधताना मुहूर्त पाहणे गरजेचे आहे. 

देवाघराचा पाया खणताना : 
मीन, मेष, वृषभ राशीत सूर्य असल्यास ईशान्येला
मिथुन, कर्क, सिंह राशीत सूर्य असल्यास वायव्येला 
तूळ, वृश्चिक, धनू राशीत सूर्य असल्यास नैऋत्येला 
धनू, मकर, कुंभ राशीत सूर्य असल्यास आग्नेयेला 
शिलान्यास किंवा कुदळ मारली पाहिजे

घर बांधताना 
सिंह, कन्या, आणि तूळ राशीत सूर्य असल्यास ईशान्येपासून
वृश्चिक, धनू आणि मकर राशीत सूर्य असल्यास वायव्येपासून
कुंभ, मीन आणि मेष राशीत सूर्य असल्यास नैऋत्येपासून
वृश्चिक, कर्क आणि मिथून राशीत सूर्य असल्यास आग्नेयेपासून काम सुरू करावे.

तलाव, विहीर खोदताना 
मकर, कुंभ, मीन राशीत सूर्य असेल तर ईशान्य कोपर्‍यातून
मेष, वृषभ, मिथुन राशीत सूर्य असेल तर वायव्य कोपर्‍यातून
कर्क, सिंह, कन्या राशीत सूर्य असेल तर नैऋत्य कोपर्‍यातून
तूळ, वृश्चिक, धनू राशीत सूर्य असेल तर आग्नेय कोपर्‍यातून खोदायला सुरवात करावी.

भरणी, कृत्तिका, मघा, विशाखा आणि मूळ नक्षत्रावर काम सुरू करू नये.

वृक्षारोपणासाठी मुहूर्त : 
घराजवळ बाग, झाडे अथवा झुडपे लावण्यासाठी मृग, रेवती, चित्रा, अनुराधा, विशाखा, हस्त, अश्विनी, पुष्य, रोहिणी, उत्तरा, उत्तराभाद्रपद, उत्तराषाढा नक्षत्रात सोमवारी, बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी अथवा शनिवारी लावणे शुभ मानले आहे. 

झाड तोडताना 
भाद्रपद किंवा माघ महिन्यात कोणतेही झाड तोडले तरी चालते. सिंह आणि मकर राशीत सूर्य असताना झाड तोडू नये.

पुनर्वसू, अनुराधा, हस्त, उत्तरा, उत्तराषाढा, स्वाती, श्रवण या नक्षत्रात झाड तोडावे.

कृष्णपक्षात झाड तोडावे, कोणतेही झाड तोडण्याच्या आदल्यादिवशी त्याला नैवेद्य दाखवून दुसर्‍या दिवशी सकाळी पाणी घालून मग झाड तोडावे.

घरभरणी 
नक्षत्र :- मृग, पुष्य, अनुराधा, उत्तराषाढा, घनिष्ठा, शततारका, चित्रा, हस्त, स्वाती, रोहिणी, रेवती.
वार :- सोमवार, बुधवार ते शनिवार
तारीख :- 2,3,5,7,10, 11, 13, 15
लग्न :- 2,3,5,6,8,11,12 
महिना :- वैशाख, श्रावण, माघ, पौष, फाल्गुन 
लग्नशुद्धी :- शुभ लग्नापासून 1,4,7,10,5,9 हे पाप ग्रह 3,6,11 या स्थानी शुभ तर 8,12व्या स्थानी रिक्त असतात. 

मुहूर्तात वास्तूचे महत्त्व :- 
ज्यावेळी वास्तुपुरुष ज्या दिशेला पाहतो, त्या दिशेला, त्या वेळीच खोदकाम करावे, दगड ठेवण्याचे दरवाजा लावण्याचे या प्रकारच्या कामासाठी घरमालकाच्या जन्मपत्रिकेचे मूळ क्षेत्र आणि दिशेनुसार नक्की करावे. गृहप्रवेश अशा वेळी करावा जेव्हा वास्तुपुरुषाची नजर दुसर्‍या दिशेला आहे.

संबंधित माहिती

शनिवारची आरती

संकष्टी चतुर्थी : संकष्टी चतुर्थीला ही 9 कामे करू नये

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

Shani Dev: शनिवारी या 5 शक्तिशाली मंत्राचा करा जप, शनिदेवांचा मिळेल आशीर्वाद

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments