Marathi Biodata Maker

कच्च्या केळीचे समोसे

Webdunia
शनिवार, 25 एप्रिल 2020 (09:02 IST)
साहित्य - 1 कप मैदा, 2 ते 3 उकडून मॅश केलेली कच्ची केळी, 1 चमचा ओवा, 5 चमचे गोड तेल, 1 चमचा जिरं पूड, 1 चमचा आमसूल पूड, 1 चमचा धणेपूड, हळद, तिखट, मीठ, आलं -लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, तळण्यासाठी तेल.
 
कृती - सर्वप्रथम मैद्यामध्ये गोड तेलाचे मोयन, ओवा, मीठ, घालून लागतं लागतं पाणी घालून घट्ट मळून घ्यायचे. ह्या गोळ्याला 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवावे.
सारणासाठी कृती - कढईमध्ये तेल घालून या मध्ये जीरपूड, आलं लसूण पेस्ट, आमसूल पूड, मॅश केलेले केळी, हळद, तिखट, मीठ घालून चांगले परतून घ्यायचे. ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. 
 
समोसे बनविण्यासाठीची कृती - आता या भिजवलेल्या गोळ्याचे बारीक गोळे करून घ्याचे. मैद्याची पोळी लाटायची. पारी जास्त जाड किंवा बारीक नसावी. अगदी मध्यमसर लाटावी. आता त्या पोळीचे मधून काप करावे. त्या कापाच्या वरील टोकाला पाणी लावून त्याला खालचे टोक जोडावे. आता त्याला त्रिकोणाकार आकार द्यावा. त्यामध्ये सारण भरावे आणि पुन्हा सर्व बाजच्या कड्यांना पाणी लावून चिकटवून घ्यावे. आता समोसे कढईत तेल गरम करून मध्य आचेवर तांबूस रंग येईपर्यंत तळावे.
चिंचेच्या चटणी किंवा हिरव्या चटणी सोबत गरमागरम खुसखुशीत समोसे सर्व्ह करावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

होळीनंतर केस गळण्याची तुम्हाला काळजी वाटते का? हे 3 सोपे उपाय अवलंबवा

जर तुम्ही ७ तासांपेक्षा कमी वेळ झोपलात तर तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतात, दुर्लक्ष करू नका

नवीन सुनेची ही पहिली होळी, सासूने या चुका करणे टाळा

लघु कथा : धाडसाची ओळख

तुम्ही उन्हाळ्याच्या सहलीला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्या बॅगेत या आवश्यक वस्तू नक्की ठेवा

पुढील लेख
Show comments