Marathi Biodata Maker

दुधी भोपळ्याचे भरीत रेसिपी

Webdunia
बुधवार, 25 सप्टेंबर 2024 (06:36 IST)
दुधी भोपळ्याचे भरीत फक्त चावीलाच नाही तर अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. तसेच लंच मध्ये पराठा किंवा पुरी सोबत देखील नेऊ शकतात. तसेच ज्यांना दुधी भोपळाची भाजी आवडत नाही ते देखील हे भरीत बोट चाटून नक्कीच खातील. तर चला जाणून घ्या रेसिपी 
 
 साहित्य-
1 दुधी भोपळा  
2 टोमॅटो 
1 मोठा कांदा 
1 छोटा चमचा आले लसूण-पेस्ट 
1 छोटा चमचा जिरे 
चिमूटभर हिंग 
2 सुक्या मिरची 
1 छोटा चमचा हळद 
1 छोटा चमचा गरम मसाला 
1 मोठा चमचा कोथिंबीर 
मीठ चवीनुसार  
 
कृती-
सर्वात आधी दुधी भोपळा धुवून त्याचे साल काढून घ्यावे. आता दुधी भोपळा किसून त्यामध्ये कांदा, टोमॅटो बारीक चिरून मिक्स करून बाजूला ठेवावे. आता एका पॅनमध्ये तेल घालून त्यामद्ये हिंग, जिरे, सुखी मिरची घालावे. मग आले लसूण पेस्ट कढईमध्ये घालावी. व यानंतर कांदा घालून परतवून घ्या. यानंतर टोमॅटो घालावा. 
 
तसेच यामध्ये आता हळद, गरम मसाला, मीठ आणि किसलेला भोपळा घालावा. व पाच मिनिट शिजू द्यावे. यानंतर यावर कोथिंबीर घालून गार्निश करावे. तर चला तयार आहे आपले दुधी भोपळ्याचे भारित, जे तुम्ही पराठा किंवा पुरीसोबाबत सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

Fasting Energy Drink एकादशीला बनवा उपवासाचा ऊर्जावर्धक शेक

मॉर्निंग वॉक करताना काय करावे काय करू नये जाणून घ्या

Career in Diploma in Medical Laboratory Technology: डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

लेझर हेअर रिमूव्हल ट्रीटमेंटचे फायदे-तोटे जाणून घ्या

Anniversary निमित्त 'रॉयल डिनर मेनू' बनवून "जोडीदाराला द्या सरप्राईज''

पुढील लेख
Show comments