ज्यांना पनीर हा प्रकार आवडतो त्यांना पनीर कोणत्याही रूपात खायला दिलेले नक्कीच आवडते. पण आज जी आम्ही आपल्याला रेसिपी सांगणार आहोत ती खूप खास आहे. होय, आणि या चविष्ट सुगंधित रेसिपीचे नाव आहे दम पनीर. साधारणपणे आपण पंजाबी ढाबा आणि रेस्टारेंट मध्ये ही रेसिपी खाद्य पदार्थच्या मेनू कार्डात बघतो. चला तर मग जाणून घेऊया की पंजाबी तडका लावून दम पनीर कसे बनवायचे ते....
सर्वप्रथम पनीर बनविण्यासाठी पॅन मध्ये तेल गरम करून त्यात लवंग, वेलची आणि दालचिनी घालून खमंग वास येई पर्यंत परतून घ्या. या मध्ये कांदा, आलं, लसूण, हिरव्या मिरचीची पेस्ट घालून खमंग परतून घ्या. नंतर यात धणेपूड, जिरेपूड, काळी मिरी पूड, हळद, लाल तिखट, मीठ घालून दही मिसळा. जरा शिजवल्यावर यामध्ये पनीर आणि क्रीम सह अर्धा कप पाणी घाला. पॅनला फॉईल पेपर ने झाकून त्यावर झाकण लावून 15 मिनिटासाठी मंद आंचेवर शिजवा.
आपणास कोरडे हवे असल्यास ग्रेव्हीला अजून काही वेळ शिजवून घ्या. चविष्ट असे हे दम पनीर खाण्यासाठी तयार आहे, याला कोथिंबीर आणि पुदिन्याने सजवून गरम गरम सर्व्ह करा.