Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्नॅक्स मध्ये बनवा चीज कॉर्न कटलेट, सोप्पी रेसिपी लिहून घ्या

Webdunia
गुरूवार, 20 जून 2024 (07:00 IST)
संध्याकाळच्या चहा सोबत तुम्हाला काही चविष्ट आणि लवकर बनणारे स्नॅक्स बनवायचे असेल तर तुम्ही नक्कीच चीज कॉर्न कटलेट रेसिपी ट्राय करा. अगदी झटपट आणि चविष्ट बनतात  चीज कॉर्न कटलेट, तर चला लिहून घ्या रेसिपी 
 
साहित्य-
दोन कप स्वीटकॉर्न 
एक कप चीज 
चार मोठे चमचे गाजराचा किस 
चार मोठे चमचे कापलेली शिमला मिर्ची 
एक बारीक चिरलेला कांदा  
चार चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर 
अर्धा चमचा हळद 
एक चमचा तिखट 
एक चमचा धणे पूड 
एक चमचा जिरे पूड 
एक चमचा मीठ 
चार उकडलेले बटाटे 
चार मोठे चमचे 
तेल 
 
कृती- 
कॉर्न कटलेट बनवण्यासाठी मिक्सरमधून स्वीटकॉर्न जाडबारीक अश्या पद्धतीने दळून घ्या. यामध्ये गाजर, सिमला मिरची, कांदा, कोथिंबीर घाला. मग यामध्ये हळद, तिखट, धणे पूड, जिरे पूड, मीठ घाला. आता यामध्ये उकडलेले बटाटे आणि किसलेले चीज चांगल्या प्रकारे मिक्स करा. आता ब्रेड क्रम्ब्स वर मक्याचे पीठ घालावे. व नरम गोळा बनवावा. हातांना तेल लावून गोल आकार द्यावा. एका कढईमध्ये तेल  गरम करून त्यामध्ये फ्राय करावे. तर चला तयार आहे आपले चीज कॉर्न कटलेट, सॉस सोबत गरम सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Makeup Tricks : हिवाळ्यात तुमची लिपस्टिक आणि आयलायनर कोरडे झाले आहेत का? या टिप्स वापरा

मुलांमध्ये खोकला कमी करण्यासाठी हे ५ घरगुती उपाय वापरून पहा

Valentine week days list जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीक लिस्ट, असे व्यक्त करा तुमचे प्रेम

अकबर-बिरबलची कहाणी : चोराच्या दाढीतला एक ठिपका

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

सर्व पहा

नवीन

लघू कथा : भगवान शिव यांना तिसरा डोळा कसा मिळाला?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

यखनी सूप रेसिपी

Hug Day Recipe हरा भरा कबाब बनवून पार्टनरला द्या सरप्राइज

हग डे वर मिठी मारण्याचे 5 सर्वोत्तम आरोग्य फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments