Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कांदा-लसूण शिवाय बनवा बटाट्याची रसदार भाजी

Webdunia
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024 (08:00 IST)
साहित्य-
बटाटे - पाच चिरलेले
टोमॅटो - दोन चिरलेले 
हिरवी मिरची - दोन चिरलेली 
कोथिंबीर - अर्धा कप चिरली 
जिरे - 1 चमचा 
हिंग - चिमूटभर
हळद -अर्धा चमचा 
धणे पूड - अर्धा चमचा  
तिखट 
गरम मसाला 
चवीनुसार मीठ 
तेल 
 
कृती-
एका पॅनमध्ये तेल घालून जिरे आणि हिंग घालावे. मग त्यामध्ये हिरवी मिरची घालावी. आता टोमॅटो घालावे व परतवून घ्यावे त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. आता पॅनमध्ये टोमॅटोची ही प्युरी घालावी व वरतून हळद, तिखट, धणे पूड, मीठ घालावे व परतवून घ्यावी त्यानंतर यामध्ये बटाटे घालावे व मिक्स करावे आता झाकण ठेऊन वाफ येऊ द्यावी. तसेच भाजी शिजल्यानंतर त्यावरून कोथिंबीर घालावी तर चला तयार आहे आपली कांदा लसूण न वापरता रसदार बटाटा भाजी, गरम पोळी किंवा पराठा सोबत सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

डाळी भाज्यांमध्ये लिंबाचे काही थेंब पिळून खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात ते जाणून घ्या

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिप मजेदार बनवायचे असेल तर या ५ टिप्स अवलंबवा

जातक कथा : घुबडाचा राज्याभिषेक

कारल्यातील कडूपणा अश्या प्रक्रारे काढून टाका

Chaitra Navratri Special Recipe स्वादिष्ट भोपळ्याची भाजी

पुढील लेख
Show comments