Marathi Biodata Maker

रविवार स्पेशल बनवा हेल्दी, चविष्ट आणि झटपट होणाऱ्या रेसिपीज

Webdunia
रविवार, 22 मार्च 2026 (08:00 IST)
रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस आणि निवांतपणे काहीतरी छान खाण्याचा दिवस! पण 'काहीतरी छान' म्हणजे नेहमीच तळलेले किंवा जड पदार्थ असायला हवेत असं नाही. रविवार निमित्त तुमच्यासाठी काही हेल्दी, चविष्ट आणि झटपट होणाऱ्या रेसिपीज नक्कीच ट्राय करू शकतात . 
ALSO READ: Sunday Special Breakfast रव्याची स्वादिष्ट टिक्की रेसिपी
१. नाश्त्यासाठी
ओट्स आणि भाज्यांचे उत्तप्पे
नेहमीच्या डोशापेक्षा हा प्रकार अधिक पौष्टिक आणि फायबरयुक्त आहे.
 
साहित्य-१ वाटी ओट्स पावडर, अर्धी वाटी रवा, दही, किसलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, हिरवी मिरची आणि कोथिंबीर.
 
कृती-ओट्स पावडर, रवा आणि दही एकत्र करून १५ मिनिटे भिजत ठेवा. त्यात सर्व भाज्या आणि चवीनुसार मीठ टाका. नॉन-स्टिक तव्यावर थोडे तेल लावून छोटे उत्तप्पे सोडा. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
 
२. दुपारच्या जेवणासाठी
मेथी-मटार पनीर पुलाव 
हा पुलाव प्रोटिनने भरपूर आहे आणि चवीलाही अप्रतिम लागतो.
 
साहित्य-बासमती किंवा ब्राऊन राइस, ताजी मेथी, मटार, पनीरचे तुकडे, खडा मसाला (दालचिनी, लवंग, तमालपत्र), आलं-लसूण पेस्ट.
 
कृती- कढईत थोडे तूप घालून पनीरचे तुकडे परतून घ्या. त्यात खडा मसाला आणि आलं-लसूण पेस्ट टाका. बारीक चिरलेली मेथी आणि मटार परतून घ्या. भिजवलेला तांदूळ टाकून आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ घालून शिजवा. वरून तळलेले पनीरचे तुकडे टाका. हा पुलाव रायत्यासोबत छान लागतो.
 
३. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी
भाजलेले चटपटीत मखाणे
चिप्स किंवा वेफर्सपेक्षा मखाणे हा उत्तम पर्याय आहे.
 
साहित्य: मखाणे, थोडे तूप, हळद, लाल तिखट, चाट मसाला आणि मीठ.
 
कृती: मंद आचेवर मखाणे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. त्यात थोडे तूप टाकून सर्व मसाले मिक्स करा. झाले तुमचे 'हेल्दी स्नॅक्स' तयार!
 
४. गोड पदार्थासाठी
खजूर आणि ड्रायफ्रूट्स लाडू 
साखर किंवा गूळ न वापरता हे लाडू ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे.
 
साहित्य: बिया काढलेला खजूर, बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता आणि थोडे तूप.
 
कृती: सर्व ड्रायफ्रूट्स थोडे तूप घालून भाजून घ्या आणि जाडसर कूट करा. खजूर मिक्सरमध्ये फिरवून घ्या. आता खजूर आणि ड्रायफ्रूट्स एकत्र करून त्याचे छोटे लाडू वळा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Sunday special healthy breakfast चविष्ट ओट्स पराठे पाककृती
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Sunday Special Recipe स्वादिष्ट असा पंजाबी मसाला पुलाव

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

Career in Dploma in Dental hygiene after class 12th : 12 वी नंतर डेंटल हाइजीन मध्ये करिअर बनवा पात्रता जाणून घ्या

नैतिक कथा : छोटासा ससा

Ice Facial कडक ऊन आणि घामावरचा सर्वोत्तम उपाय, चेहऱ्यावरील सूज कमी करते आणि त्वचा टवटवीत ठेवते

इस्रायलमध्ये नोकरीची मोठी संधी: १० वी पास उमेदवारांसाठी ३५०० जागा, पगार २ लाख रुपये महिना

Achari Bhindi Recipe: पारंपरिक भारतीय मसाल्यांचा वापर करून आचारी भेंडी अशा प्रकारे बनवा

पुढील लेख
Show comments