हिवाळ्याचा हंगाम सुरू होताच बरेच नवीन खाद्य पदार्थ आठवतात. या पदार्थांना हिवाळ्यातच चव येते आणि ते याच दिवसात बनवले जातात. या दिवसात मटारची आवक भरपूर असते भाजी, पुलाव, पोहे, समोसे हे सर्व मटार शिवाय अपूर्ण वाटतात. जर आपण मटार खाण्याची आवड ठेवता तर आपल्यासाठी आज घेऊन आलो आहोत मटारची टिक्की बनविण्यासाठीची सोपी रेसिपी
कृती - सर्वप्रथम हरभरा डाळीचे पीठ आणि एक चथुर्तांश रवा घेऊन पातळ घोळ तयार करा. हिरवे मटार वाफ घेऊन शिजवून ठेवा. थंड झालेले मटार लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या आणि आल्यासह वाटून घ्या. हे वाटण हरभरा डाळीचे पीठ आणि रव्याच्या पातळ घोळामध्ये मिसळा आणि त्यामध्ये हळद, तिखट, धणेपूड, चाट मसाला, मीठ, कांदा, कोथिंबीर घालून घोळ तयार करा.
आता एका कढईत तेल गरम करून ठेवा या गरम तेलात चिमूटभर हिंग घाला. या घोळाला मध्यम आचेवर परतून घ्या या मधले पाणी आटू द्या. घट्टसर गोळा झाल्यावर काढून घ्या आणि हाताने त्याला टिक्की चा आकार द्या. हरभऱ्याच्या डाळीचा पेस्ट तयार करून या टिक्कीला त्यात घाला. या टिक्कीला गरम तेलात तांबूस रंग येई पर्यंत तळून घ्या. मटारची टिक्की खाण्यासाठी तयार. आपण हे सॉस किंवा चटणी सह सर्व्ह करा.