Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्त्रियांनी का ओलांडला उंबरठा?

रूपाली बर्वे
स्त्री म्हणजे शक्ती, पुरुष म्हणजे सहन शक्ती. हा जोक ऐकल्यावर हसू येतही असेल कदाचित, पुरुषांना तर नक्कीच आणि अनेक स्त्रियांनाही. कारण स्त्रियांनी आपल्यावर शोषण, आरोप करण्याचे अधिकार अनेक काळापासूनच पुरुषांना दिलेले आहेत. हसत अपमान सहन करणे, प्रत्येकजागी आधी पुरुषांना मान देणे हे स्त्रीने सहजपणे आपल्या स्वभावात सामील करून घेतले आहेत किंवा लहानपणापासून तिला ही शिकवण मिळाली असावी. आणि ही शिकवण मिळाली नसली तरी घरात, समाजात हेच बघत-बघत ती मोठी झाली असावी आणि तिने आपोआप दबून राहायचे असा निश्चय केला नसला तरी तिच्या वागणुकीत याच्या विरोधही दिसून आलेला नाही.
 
आपण लाख म्हणतो की आज स्त्रियांच्या परिस्थित खूप सुधार झाला. त्या खाद्यांला खाद्या देऊन चालतात. पण खरं बघायला गेलं तर हे फक्त एक वर्ग विशेषपर्यंत मर्यादित आहे. परिस्थित बदली आहे आणि बदलत आहे यात शंकाच नाही पण खूप काही गमण्याआधी ती बदलली पाहिजे.
 
स्त्रियांना पुढे वाढण्यासाठी वाव द्या याचा अर्थ असा नाही की त्यांना पुरुषांपुढे जाण्याची लालूस आहे. पण किमान समान पातळीवर तरी येऊ द्या. शारीरिक रूपाने ती पुरुषांची बरोबरी करू शकत नाही हे स्त्रीचं वैशिष्ट्ये झालं. केवळ या गोष्टीमुळे पुरुषाने तिच्यावर हक्क गाजवावा असं होत नाही.
 
ती चिडचिड करते, ती फार बोलते, ती भांडते, ती रडते, ती रुसून बसते, तिचा कधीही मूड बदलतो म्हणून तिची टिंगल उडवण्यापेक्षा तिचा स्वभाव असा का असावा यावर विचार करण्याची गरज आहे. कदाचित वयामानाने तिच्या शरीरात होत असलेले बदल यासाठी कारणीभूत असावे. अशात तिची थट्टा करणे किंवा तिला चिडवण्याऐवजी तिला समजून घेतलं तर मानसिक रूपाने निश्चितच हे बदल तिला सोपे जातील.
 
स्त्री पुरुष समानता, स्त्री स्वातंत्र्य, स्त्री मुक्ती या जागरूकतेमुळे हल्ली आणखी गोंधळ होऊन बसला आहे असेही कधी-कधी विचार येतो. पण ही क्रांती का आली असावी, हा गोंधळ का उडाला असावा, याचे केवळ एकच कारण की आधीच्या काळात स्त्रियांबरोबर झालेले अत्याचार. त्या स्त्रिया अत्याचार, अपमानाच्या बळी पडल्या नसता तर आजच्या स्त्रियांना उंबरठा ओलांडण्याची वेळच आली नसती. आजही पुरुषाने कमावून आणले असते आणि स्त्रियांनी घर सांभाळत गोडीगुलाबीने संसार मांडला असता. आज स्त्री स्वातंत्र्यासाठी बाहेर पडली हे कित्येक पुरुषांना आवडत नसेल कदाचित पण यात पुरुषांसकट स्त्रियांचीही ओढाताण होती आहे हे ही तेवढंच खरं आहे. बाहेर पडल्यावर घरगुती कामांचा ताण कमी झाला असेतर मुळीचंच नाही उलट शारीरिक आणि मानसिक ताण वाढलाच आहे म्हणायला हरकत नाही. पुरूष तर आजही नोकरी करून आल्यावर तेवढाच दमतो पण बाई मात्र खंबीरपणे स्वयंपाकघरात उभी दिसते. नाहीतर पोटातील कावळ्यांना शांत कोण करेल.
 
एकूण स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी हे गरजेचं होतं. असो, स्त्रियांने पुरुषांनी समजून घेतलं पाहिजे ही इच्छा असली तरी याहून अधिक गरज आहे स्त्रियांनी स्त्रियांना समजून घेण्याची. ज्या दिवशी हा बदल घडेल त्या दिवशी स्त्री कमजोर नाही तर देवाने निर्मित केलेली सर्वात सुंदर कृती आहे याची जाणीव होईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

भरलेले लाल मिरचीचे लोणचे रेसिपी

छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी Essay On Chhatrapati Shivaji Maharaj

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी विचारले जाणारे प्रश्‍न

कॉर्न मेथी मसाला रेसिपी

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes

पुढील लेख
Show comments