ती .....
स्वतंत्र विचारांची आहे
उन्मुक्त आहे
सुशिक्षित आहे....सुसंस्कृत आहे
सुघड आहे.....सबळ आहे
तिच्यात अहं नाही
खोटा अभिमान नाही
स्वार्थ नाही....
ती पिढ्या जोपासते
ती पिढ्या घडवते...... समाज घडवते
स्वत्व जोपासत... संसार सांभाळत
संस्कृतीचा वारसा पुढे नेते.....
ती.....
कुटुंबाचा आधार
नात्यांचा सुवर्णबंध
वयस्क आणि तरुणाईचा दुवा
पिढ्यामधील ताळमेळ
विनासायास सगळंच
ती लीलया पेलते
आणि म्हणूनच ती वेगळीही
ती.....
तिच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला
तिच्या प्रयासाना नेहेमी यश मिळते
तिला सक्ती नाही
पण तिच्या याच प्रयत्नवादी असण्याने
तिला तिचा देव.... तीच साध्य
तीच सुख...तिचा परम आनंद
मिळतो...नेहेमीच
ती....
आशावादी...... प्रेरणास्रोत
स्वतःवर प्रचंड विश्वास असणारी
आपल्या बाहुत जग सामावून घेणारी
सुदृढ विचारांची......मन: पुत जगणारी
आयुष्यावर नितांत प्रेम करणारी
एक सामान्य ....पण असामान्य
ती.....