Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

2.22 टक्के कमी पाणीसाठा; मुंबईकरांसाठी 103 दिवसांचे पाणी

Webdunia
गुरूवार, 13 जुलै 2023 (07:56 IST)
२.२ percent less water storage मुंबईला दररोज होणारा ३,८५० दशलक्ष पाणीपुरवठा पाहता हा पाणीसाठा पुढील १०३ दिवस पुरेल इतका आहे. मात्र सध्या दहा टक्के पाणीकपात सुरू असल्याने त्याप्रमाणे निष्कर्ष काढल्यास सदर पाणीपुरवठा हा पुढील ११५ दिवस पुरेल इतका आहे. मात्र गतवर्षी याच दिवसापर्यंत सात तलावांत मिळून ७,२८,३८६ दशलक्ष लिटर (५०.३२ टक्के) इतका पाणीसाठा होता.
 
त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा तलावांत ३,२८,१४५ दशलक्ष लिटर इतका (२२.६७ टक्के) पाणीसाठा कमी आहे.
मुंबई शहराला मुंबईतील विहार व तुळशी या अगदी छोट्या क्षमतेच्या दोन तलावांतून आणि १५० किमी दूर अंतरावरील ठाणे जिल्हा परिसरातील अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा या पाच तलावांतून असे एकूण सात तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. मात्र मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी दरवर्षी पावसाळा संपल्यावर १ ऑक्टोबर रोजीपर्यंत सात तलावांत मिळून एकूण १४ लाख ४७ हजार ३६३दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा असणे आवश्यक असते.
 
पाऊस उशीरा सुरु झाल्याचा फटका
मात्र यंदा पावसाचे आगमन २४ जून रोजी उशिराने झाले. त्यातही अपेक्षित पाऊस पडत नसल्याने तलावांतील पाणीसाठ्यातही अपेक्षित वाढ होत झालेली नाही. उलट गतवर्षीच्या तुलनेत यंदा तलावांत २२.६७ टक्के पाणीसाठा कमी आहे. मुंबई महापालिकेने तलावातील पाणीसाठचा आढावा घेऊनच १ जुलैपासून मुंबई व मुंबई महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो त्या ठाणे, भिवंडी, निजामपूर पालिका क्षेत्रातही १० टक्के पाणीकपात लागूं केली.
 
सात तलावातील पाणीसाठा, टक्केवारी –
———————————————————-
तलाव        पाणीसाठा          टक्केवारी
————- ———— —————————-
उच्च वैतरणा  ८,२२०              ३.६२
 
मोडकसागर  ६७,६२६           ५२.४५
 
तानसा        ७५,९२०            ५२.३३
 
मध्य वैतरणा  ७५,१८८            ३८.८५
 
भातसा      १,५५,४८०            २१.६८
 
विहार        १२,५२६              ४५,२२
 
तुळशी         ५,१८३             ६४.४१
———————————————————-
एकूण
२०२३           ४,००,१४१           २७.६५
२०२२            ७,२८,२८६          ५०.३२
– — —– – ———————-
कमी पाणीसाठा ३,२८,१४५       २२.६७

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

LIVE: गरीब कामगारांना घरे देण्याच्या योजनेबाबत उपमुख्यमंत्री शिंदेनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी उद्धव ठाकरे गटाकडून नवी मागणी

महाराष्ट्रात गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरे बांधली जातील, उपमुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयात एक शिंगे गेंडा धर्मेंद्रचा मृत्यू

नवी मुंबईत हेडकॉन्स्टेबलची गळा आवळून हत्या

पुढील लेख
Show comments