Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई विमानतळावर अपघातात परदेशी प्रवाशासह 5 जण जखमी

accident
Webdunia
रविवार, 2 फेब्रुवारी 2025 (17:10 IST)
मुंबई विमानतळावर रविवारी भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले असून, यात ५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. रविवारी मुंबईतील टर्मिनल 2 निर्गमन परिसरात मर्सिडीज-बेंझ पर्यटक वाहनाला अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
ALSO READ: मुंबईत आयपीएस अधिकाऱ्याचा पतीने केली घर मिळवून देण्याच्या नावाखाली 25 कोटींची फसवणूक
मुंबई पोलिसांनी अपघाताबाबत माहिती देताना सांगितले की, चालकाने प्रवाशांना गेट 1 वर खाली उतरवले, मात्र त्यांना खाली उतरवल्यानंतर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे वाहन गेट 3 समोरील रम्पवर  आदळले.
ALSO READ: देशातील पहिले AI विद्यापीठ महाराष्ट्रात बांधले जाणार, ब्लू प्रिंट तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकार चे मोठे पाउल
या अपघातात 5 जण जखमी झाले आहे. त्यात झेक प्रजासत्ताकचे दोन परदेशी प्रवासी आणि विमानतळावरील तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पाचही जणांची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ALSO READ: ठाण्यात बंदी असलेले कफ सिरप विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश,5 आरोपींना अटक
वाहन आणि चालक ताब्यात असल्याच्या वृत्ताला मुंबई पोलिसांनी दुजोरा दिला आहे. घटनेच्या वेळी चालक दारू किंवा अंमली पदार्थांच्या नशेत नव्हता, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Edited By - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

हा नवा भारत कोणालाही छेडत नाही, पण जर कोणी छेडले तर ते त्याला सोडणार नाही-योगी आदित्यनाथ

Pahalgam Terror Attack : महाराष्ट्रात राहणाऱ्या ५५ ​​पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश

भीषण स्फोट मध्ये 406 जखमी, अनेकांचा मृत्यू

ठाकरे गटाला निमंत्रण दिल्याने मनसेवर भाजप नाराज, बैठकीला उपस्थित राहण्यास दिला नकार

LIVE: ठाकरे गटाला आमंत्रित केल्याबद्दल मनसेवर भाजप नाराज

पुढील लेख
Show comments