Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अलिबागजवळ मांडवा जेट्टीत भर समुद्रात बोट उलटूनही ७८ प्रवासी सुखरूप

boat capsizes
Webdunia
शनिवार, 14 मार्च 2020 (16:28 IST)
मुंबई – अलिबाग प्रवासासाठी सोयीचं ठरलेल्या जलवाहतुकीतील प्रवासी बोट अलिबागमधील मांडवा जेट्टीवर उलटली होती. या बोटीतील ७८ प्रवाशांना वाचवण्यात यश आले असून आज सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली.
 
मांडवा जेट्टीपासून जवळच असलेल्या खडकावर ही बोट आदळल्याने हा अपघात झाला. गेट वे ऑफ इंडिया येथून अलिबागच्या दिशेने जाणारी ही प्रवासी बोट मांडवा जेट्टीपासून जेमतेम १ किलोमीटर अंतरावर असतानाच ही भीषण दुर्घटना घडली. बोटीचा अपघात झाला तेव्हा सुदैवाने जवळच पोलिसांची गस्ती बोट होती. बोटीतील कर्मचारी तसेच पोलिसांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत मदतकार्य सुरू केले. बोटीत ७८ प्रवासी होते. या सर्वांना वाचवण्यात यश आले.
 
गस्ती बोट तसेच स्पीड बोटच्या साह्याने सर्व प्रवाशांना मांडवा जेट्टीवर नेण्यात आले. ही बोट लाकडाची असून नियमित प्रवासीसेवा करणारी होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

दिल्लीत वादळ आणि पावसामुळे विमान प्रवासावर परिणाम, ४० उड्डाणे रद्द

LIVE: पानीपतमध्ये 'मराठा शौर्य स्मारक' बांधले जाणारा म्हणाले राज्यपाल राधाकृष्णन

नागपूर : दारूचा ग्लास पडून फुटल्यानंतर एका तरुणाला बेदम मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

पानीपतमध्ये बांधले जाणार 'मराठा शौर्य स्मारक', राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले मजबूत महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेले हे पाऊल

पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर १० लाख सायबर हल्ले

पुढील लेख
Show comments