Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मंबईमध्ये अपार्टमेंटमध्ये आढळला TISS विद्यार्थ्याचा मृतदेह

death
Webdunia
सोमवार, 26 ऑगस्ट 2024 (10:28 IST)
मुंबईतील TISS च्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी सकाळी विद्यार्थ्याचा मृतदेह त्याच्या अपार्टमेंटमध्ये आढळून आला. तसेच विद्यार्थी त्याच्या काही मित्रांसोबत पार्टीला गेला होता, असे सांगण्यात येत आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार, अनुराग जयस्वाल असे विद्यार्थ्याचे नाव असून तो लखनऊचा रहिवासी होता तसेच रविवारी सकाळी त्याचा मृतदेह त्याच्या अपार्टमेंटमध्ये आढळून आला, जिथे तो भाड्याने राहत होता. त्याच्या अनेक मित्रांसह तो मुंबईला लागून असलेल्या वसई येथे एका पार्टीला गेला होता आणि तेथे त्याने दारू प्यायली. घरी परतल्यानंतर अनुराग सकाळी उठला नाही याकरिता त्याच्या रूममेट्सने त्याला चेंबूर येथील रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  
 
या प्रकरणात वरिष्ठांवर रॅगिंग झाल्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच पोलीस मृत अनुरागच्या सर्व मित्रांची चौकशी करत आहेत. लखनौ येथील मृतांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली असून ते मुंबईला रवाना झाले आहेत. एका पोलीस अधिकारींनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थ्याचा मृतदेह मुंबईतील राजावाडी रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात दुरावा कोणी निर्माण केला?नितेश राणेंच्या वक्तव्याने गोंधळ

LIVE: शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अंकुश कडूंची भर रस्त्यात हत्या

छत्रपती संभाजीनगर येथील एका बँकेच्या शाखेत चोरीदरम्यान सिलिंडरचा स्फोट,बँक जळून खाक

मुंबईत जैन मंदिर पाडल्यावरून गदारोळ,अबू आझमींनी दिली प्रतिक्रिया

नागपुरात पूर्व वैमनस्यातून शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अंकुश कडूंची भर रस्त्यात हत्या, आरोपी फरार

पुढील लेख
Show comments