Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विधान भवनात कोरोना चाचणी, तब्बल ३२ जणांना कोरोनाची लागण

विधान भवनात  कोरोना चाचणी   तब्बल ३२ जणांना कोरोनाची लागण
Webdunia
सोमवार, 27 डिसेंबर 2021 (08:08 IST)
मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनाला कोरोना संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. विधान भवनात घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीतून तब्बल ३२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.
 
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधान भवनात येणार्‍या सर्वांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दुसर्‍यांदा आरटीपीसीर चाचण्या करण्यात आल्या. यात एकूण २ हजार २०० लोकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये एकूण ३२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यांना कोरोनाची लागण झालेली आहे अशांमध्ये पोलीस कर्मचार्‍यांसह, शासकीय कर्मचारी आणि पत्रकारांचा समावेश आहे. यात आमदार, मंत्री अथवा कोणत्याही नेत्याचा समावेश नाही.
 
भाजप आमदार समीर मेघे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. यानंतर आणखी ३२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

ज्ञानेश्वरी संपूर्ण अध्याय (१ ते १८)

Holi Vastu Upay घरातील तिजोरी भरायची असेल तर होळीला करा हे 5 उपाय

काकडी खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?जाणून घ्या

ऑफिसमध्ये चांगली छाप हवी असेल तर कामाच्या ठिकाणी या गोष्टी लक्षात ठेवा

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभेत संघ नेत्याच्या विधानाने गोंधळ झाला

जळगावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू

'रस्ते अपघातांमध्ये वाढ होण्यास अभियंते जबाबदार, आपल्याला इतर देशांकडून शिकण्याची गरज आहे म्हणाले नितीन गडकरी

राहुल गांधींनी धारावीतील चामडे उद्योगातील कामगारांना भेट दिली

LIVE: राहुल गांधींनी धारावीतील कामगारांना भेट दिली

पुढील लेख
Show comments