Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई विमानतळावर 4.84 कोटींचे सोने जप्त, 4 जणांना अटक

Webdunia
शनिवार, 4 जानेवारी 2025 (16:56 IST)
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळावर सोन्याच्या तस्करीचे प्रकरण उघडकीस आले आहे. महसूल गुप्तचर संचालनालय(डी आरआय) ने गुप्त माहितीच्या आधारे सोन्याची तस्करी आणि विमानतळाच्या बाहेर वाहतूक करणाऱ्या विमानतळ कर्मचाऱ्यांच्या टोळीला ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची टोळी छोट्या तुकड्यांमध्ये सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती डीआरआयला मिळाली त्यांनी माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी छापा टाकला आणि दोन कर्मचाऱ्यांना सोने बाहेर नेट असताना ताब्यात घेतले. 

त्यांनतर केलेल्या कारवाईत तपासा दरम्यान 5 अंडाकृती कॅप्सूल आणि 2 मेणाच्या स्वरूपात सोन्याची धूळ देखील जप्त करण्यात आली आहे. या सोन्याचे वजन 6.05 किलो असल्याचे उघड झाले आहे. याचे बाजार मूल्य 4.84 कोटी रुपये आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळावर कामाच्या नावाखाली ही टोळी छोट्या तुकड्यांमध्ये सोने आणून विमानतळाच्या बाहेर पोहोचवायची ही टोळी मेणाच्या स्वरूपात किंवा कॅप्सुलच्या स्वरूपात लपवून तस्करी करायचे पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. 
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

युझवेंद्र चहल आणि धनश्री यांच्या घटस्फोट होणार? इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले

बांदीपोरामध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले, 2 जवान शहीद, 4 जखमी

LIVE:आरएसएसची बाबासाहेबांबद्दलची माहिती खोटी

आरएसएसची बाबासाहेबांबद्दलची माहिती खोटी, बसप नेत्याने संघाचा दावा फेटाळला

दिल्लीत निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा! चुकीची पाण्याची बिले माफ केली जातील

पुढील लेख
Show comments