Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर आणखी एका मंत्र्याचा पाठिंबा, फोटो ट्विट करत विचारला ‘हा’ सवाल

Webdunia
मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (16:39 IST)
मुंबईत क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात NCB कडून करण्यात आलेल्या कारवाईवर राष्ट्रवादीचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. एनसीबीकडून करण्यात आलेल्या अनेक कारवाया या बनावट असल्याचे सांगत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्राद्वारे (Caste certificate) नोकरी मिळवल्याचा दावा मलिक यांनी केला. नवाब मलिक यांच्या आरोपानंतर आता मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या प्रकरणात (Mumbai Cruise Drug Case) उडी घेतली आहे.
 
जितेंद्र आव्हाड यांनी एक फोटो ट्विट केला आहे. हा फोटो ट्विट करताना त्यांना ‘पेहचान कौन?’ असा सवाल केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेले हे ट्विट नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ केल्याची चर्चा आहे.
 
दरम्यान, नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट केला आहे. याशिवाय एनसीबी (NCB) अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे. या व्यक्तीने बनावट जात प्रमाणपत्र (Fake caste certificate) घेऊन नोकरी मिळवली, एससी सर्टीफिकेट (SC Certificate) मिळवले. जे जन्म प्रमाणपत्र आम्ही ट्विट केलं आहे ते खरं आहे. तो जन्माचा दाखला (Birth certificate) खरा आहे. ज्या जन्म प्रमाणपत्रावर समीर दाऊद वानखेडे (Sameer Dawood Wankhede) नाव आहे. पूर्ण परिवार मुस्लिम (Muslim) म्हणून जगत आहेत, हे सत्य आहे. आम्ही दलित संघटनांबरोबर बोलत आहोत. यासंदर्भात दलित संघटना तक्रार करतील. अनेक लोक तक्रार करणार आहेत. सत्य देशासमोर येईल, असंही मलिक यांनी सांगितले. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments