Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईतील रहिवासी इमारतीला भीषण आग, किमान 50 जणांना बाहेर काढले, कोणतीही जीवितहानी नाही

Webdunia
शुक्रवार, 9 जून 2023 (12:02 IST)
मुंबई- दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरातील एका सात मजली निवासी इमारतीला गुरुवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
 
धनजी रस्त्यावरील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिराजवळ असलेल्या इमारतीत सकाळी 1.30 च्या सुमारास आग लागली आणि इमारतीमध्ये अडकलेल्या अनेकांना बाहेर काढण्यात आले, असे त्यांनी सांगितले.
 
"घटनेच्या वेळी आवारात 50 ते 60 लोक अडकले होते पण त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळच्या इमारतीच्या पायऱ्यांचा वापर करून सुखरूप बाहेर काढले," असे महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
 
अग्निशमन दलाच्या 12 गाड्या सध्या घटनास्थळी हजर असून आग विझवण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
 
सर्व बाजूंनी आग विझवण्याचे काम सुरू आहे, असे ते म्हणाले. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
 
पहिल्या आणि दुसर्‍या मजल्यावरील छताचा काही भाग आणि जिन्यांचा काही भाग कोसळला असल्याने सावधगिरी म्हणून इमारतीच्या बाहेरून अग्निशमन ऑपरेशन केले जात आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
 
आग तळमजल्यावरून सुरू होऊन पाचव्या मजल्यापर्यंत पसरल्याचे त्यांनी सांगितले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

संबंधित माहिती

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments