Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई जिल्हा बँकेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा झाल्याचे उघड

Webdunia
गुरूवार, 24 मार्च 2022 (21:51 IST)
मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विशेष लेखा परीक्षक निलेश नाईक यांच्याकडून चाचणी लेखा परीक्षण करण्यात आले. या अहवालानुसार मुंबई बँकेत २०१४-१५ ते २०१९-२० काळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा झाल्याचे उघड़ झाले आहे. या संदर्भात सहकार विभागाकडे रितसर तक्रार दाखल करुन सुद्धा काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेवून कलम १२०(ब), १९९, २००, ४०६, ४०९, ४१७, ४२०, ४६५, ४६० अन्वये व ईतर तत्सम कायद्य अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
 
विशेष लेखा परीक्षण अहवालानुसार मुंबई बँकेत जवळपास ₹ २००० कोटीचा घोटाळा झाला आहे. या कालखंडात बोगस मजूर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकार बँकेचे अध्यक्ष होते. एकीकडे मोदीजी म्हणतात ना खाऊंगा ना खाने दूंगा आणि दुसरीकडे त्यांनी नेमलेले वरिष्ठ सभागृहातील विरोधी पक्षनेत्याचे मात्र २००० कोटी रूपयांच्या भ्रष्टाचारात हात बरबटलेले आहेत. आश्चर्य म्हणजे ED, CBI ला यात काहीही दिसून येत नाही. भारतीय जनता पक्षाने आत्मपरीक्षण करत या नेत्यांना नारळ देवून गोरगरीब जनतेच्या मुंबई बँकेतील ठेवी सुरक्षित कराव्यात अन्यथा PMC बँकेसारखे मुंबई बँकेचे वाटोळे होण्यास वेळ लागणार नाही.महाविकास आघाडी सरकार देखील जणू काही या २००० कोटीच्या घोटाळ्यात सहभागी असल्यासारखे काहीही कारवाई करण्यास घाबरत असल्याचे दिसत आहे. परंतु आम आदमी पक्ष मुंबई बँकेत कष्टकरी, गोरगरीब मजूर यांच्या ठेवी या भ्रष्ट पुढाऱ्यांना असे गिळंकृत करू देणार नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

श्री तुळजा भवानी मातेला का दिली जाते पलंगावर निद्रा

Chandra Dosh Mukti शरद पौर्णिमेला हे करा धनलाभ मिळवा

एखादा कीटक चावला असेल तर सावधान! कीटक चावल्यास काय करावे

राग केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का?जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबईहून लंडनला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये इमर्जन्सी अलर्ट, विमान हवेत फिरते

पंखे वाले बाबा कोण ? 'लड्डू मुट्या' का होत आहे व्हायल ?

रेल्वे बुकिंग व्यवस्थेत मोठा बदल, आता किती दिवसांपूर्वी तिकीट बुक करता येईल जाणून घ्या

सरफराज-तालिब एनकाउंटर: बहराइच हिंसाचार प्रकरणातील आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: मनोज जरांगे पाटील फॅक्टर किती परिणामकारक ठरणार?

पुढील लेख
Show comments