Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कुठलीही चौकशी सूडबुद्धीने होणार नाही : मुख्यमंत्री

Webdunia
सोमवार, 31 ऑक्टोबर 2022 (15:15 IST)
मुंबई पालिकेच्या 76 कामांची नियंत्रक व महालेखापरीक्षकांकडून (कॅग) चौकशी करण्यात येणार आहे. गैरव्यवहाराच्या संशयावरून पालिकेचे विशेष लेखापरीक्षण करण्याची राज्य सरकारची विनंती ‘कॅग’ने मान्य केली. या चौकशीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले. ‘कॅगच्या चौकशीतून सर्व सत्य समोर येईल. कुठलीही चौकशी सूडबुद्धीने होणार नाही’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
 
बिर्ला हाऊसमध्ये भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची 147वी जयंती साजरी करण्यात आली. वल्लभभाई पटेल यांच्या 147वी जयंतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या कॅगच्या चौकशीबाबत भाष्य केले. “कुठलीही चौकशी सुडबुद्धीने, आकसापोटी, राजकीय हेतूने केली जाणार नाही. त्यामध्ये पारदर्शकता असेल, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर जो अहवाल येईल, त्यानंतर बोलू”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments