Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पोद्दार हाऊसिंग घेणार ग्राहकांच्या आरोग्याची काळजी

Webdunia
सोमवार, 16 मार्च 2020 (17:21 IST)
परवडणाऱ्या आणि दर्जेदार गृहनिर्मितीतील आद्य नाव असलेल्या पोद्दार हाउसिंगने कल्याणमध्ये पोद्दार रिव्हिएरा हा गृह प्रकल्प सुरू केला आहे. चार टप्प्यांत होणाऱ्या या प्रकल्पात १, १.५ आणि २ बीएचकेचे ३,५०० फ्लॅट असतील, ज्यामुळे कल्याण, उल्हासनगर आणि ठाण्यातील संभाव्य घर विकत घेणाऱ्या ग्राहकांची मागणी पूर्ण होऊ शकेल. हिरव्यागार ऐसपैस अशा १८.८ एकरांत होणाऱ्या या प्रकल्पात प्रत्येकी २३ मजल्यांचे १९ टॉवर्स असतील. त्याचबरोबर टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, क्रिकेट, फुटबॉलची मैदाने, लहान मुले आणि मोठ्यांसाठी जलतरण तलाव, जकुझी, जिम, बँक्वेट हॉल, मुलांसाठी खेण्याची जागा अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या २५ प्रिमियम सुविधाही इथे उपलब्ध असणार आहेत. नदी किनारा दिसेल अशा पद्धतीने तयार केलेले क्लब हाऊस हे या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.
 
हा प्रकल्प विविध दर्जेदार शैक्षणिक संस्थांनी वेढलेला असून, प्रकल्पात एक हॉस्पिटलही आहेच त्याचबरोबर दोन महत्त्वाची हॉस्पिटलही अगदीच जवळ आहेत. आरोग्यपूर्ण आणि समृद्ध आयुष्य जगण्याची ग्राहकांची इच्छा ध्यानात घेऊन विचारपूर्वक या प्रकल्पाचे डिझाइन तयार करण्यात आले आहे.
 
पद्मभूषण आर्किटेक्ट हफिझ कॉन्ट्रॅक्टर यांनी डिझाइन केलेल्या पोद्दार रिव्हिएरा प्रकल्पामधील इमारती इंग्रजी एचच्या (H) आकारात आणि सूर्यभ्रमाणाच्या नैसर्गिक मार्गाला साजेशा आहेत. त्यामुळे इथल्या घरांतल्या खोल्यांत अधिकाधिक सूर्यप्रकाश येतो तसेच हवा खेळती राहते, जेणेकरून शुद्ध हवा मिळू शकते. प्रत्येक खोलीतून चांगले दृश्‍य दिसते. त्याचबरोबर कमीत-कमी जागा वाया घालवून उपलब्ध जागेचा अधिकाधिक कार्यक्षम वापर करून ही आरामदायी घरे डिझाइन केली आहेत. अॅल्युमिनियम फेर्मवर्क टेक्नॉलॉजीचा उपयोग करून वापरल्या जाणाऱ्या दक्षिण कोरियातील जागतिक दर्जाच्या बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर या प्रकल्पात करण्यात आल्यामुळे ही घरे टिकाऊ होणार आहेत. तसेच कमी देखभाल खर्चात दीर्घकाळ टिकणारी घरे निर्माण करताना आग आणि भूकंपापासून संरक्षण करणाऱ्या उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचाही उपयोग करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मान्सूनमधील प्रचंड पावसानंतर होणारा पाणीसाठी आणि नदीचा पूर यापासून बचाव करण्यासाठी या प्रकल्पातील प्रत्येक इमारतीचा पाया द्रुतगती मार्गाच्या उंचीपेक्षा वरच घेण्यात आला आहे.
 
गेल्या दोन वर्षांत कल्याणमधील मालमत्तांच्या किंमती वाढतच आहेत. त्यामुळे इथल्या रहिवाशांना गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत आहे. सध्याचा काळात रिअल इस्टेटची जोमाने वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने २०२८ पर्यंत हे ठिकाण मोठे व्यापारी केंद्र होईल. नाइट फ्रँक अहवालानुसार मेट्रोच्या ५व्‍या व १२व्या लाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर ठाणे-भिवंडी-कल्याण आणि कल्याण ते तळोजा या भागात मोठ्या प्रमाणात नवी बाजारपेठ उदयाला येईल. भारत सरकारने आपल्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये कल्याणचा समावेश केला असून, रेल्वे आणि रस्त्यांनी सहज पोहोचता येत असल्याने कल्याण स्मार्ट सिटीचे  बिरूद मिरवायला सज्जही झाले आहे.
 
पोद्दार रिव्हिएरामधील फ्लॅटच्या किंमती ३३ लाख रूपयांपासून सुरू होत असून, ग्राहकाच्या गरजेनुसार विविध पर्यायही उपलब्ध आहेत.
 
या वेळी पोद्दार हाऊसिंग अँड डेव्हलपमेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक रोहित पोद्दार म्हणाले, ''पोद्दार रिव्हिएरा हा प्रकल्प तुम्हा सर्वांसमोर मांडतान मला खूप आनंद होत आहे. उच्च दर्जा, नदीचा काठ, आलिशान घरे हे सगळे आकर्षक व परवडणाऱ्या किंमतीत आणि तरीही देखभाल खर्च खूपच कमी ही या प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. हा प्रकल्प इतक्या मोक्याच्या ठिकाणी होत आहे, जिथे नव्याने होणाऱ्या मेट्रोबरोबर ट्रेन व रस्त्यानेही पोहोचणे सहज शक्य आहे, त्यामुळे हे ठिकाण गोल्डन माइल म्हणूनच ओळखले जाईल. आमचे ग्राहक आणि समाज यांचे आरोग्य चांगले रहावे या दृष्टिनेच या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. चांगल्या सुखसोयी, शांतता, अॅक्टिव्हिटी आणि कुटुंब व मित्रांसोबत आनंदात काही क्षण घालवण्यासारखे दर्जेदार वातावरण आम्ही या प्रकल्पात ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहोत.’'

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments