Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी पोलिसांचा मोठा दावा, लॉरेन्स बिश्नोईचा कोणताही सहभाग नाही अनमोल चालवतो वेगळी टोळी

Webdunia
मंगळवार, 10 डिसेंबर 2024 (11:13 IST)
Baba Siddiqui murder case: बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 13 आरोपींना 16 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच या हत्येमध्ये तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची भूमिका अजून समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी 30 नोव्हेंबर रोजी अटक केलेल्या 26 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या कडक कलमांची अंमलबजावणी केली. तसेच याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 26 आरोपींपैकी 13 जणांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्यांना 16 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. उर्वरित आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. मकोकाने सोमवारी न्यायालयाला सांगितले की, या हत्येतील तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईची भूमिका अजून उघड झालेली नाही, तर त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई वेगळी टोळी चालवत आहे.
 
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील निर्मल नगर परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अनमोल बिश्नोई हा देखील या प्रकरणात वॉन्टेड आरोपी आहे. मुंबई पोलिसांनी विशेष सरकारी वकिलामार्फत न्यायालयाला आरोपीला ताब्यात देण्याची विनंती केली, कारण या प्रकरणात अनेक छोटे-मोठे दुवे आहे आणि तपास पूर्ण करण्यासाठी त्या सर्वांना जोडणे आवश्यक आहे, त्यासाठी आरोपीची कोठडी आहे.  अनमोल बिश्नोई आणि त्याचा भाऊ आता वेगळ्या टोळ्या चालवत असल्याचेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.  

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्तंडभैरवाष्टक

खंडोबा मंदिर पाली सातारा

Shani dhaiya 2025 मध्ये शनीची सावली कोणत्या राशीवर?

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

पंचतंत्र : सिंह, उंट, कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट

सर्व पहा

नवीन

LIVE: मंगळवार 10 डिसेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्याच्या मागणीसाठी शरद पवार गटाचे नागपुरात निदर्शने

World Human Rights Day 2024: जागतिक मानवाधिकार दिन

भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या नातेवाईकाचे अपहरण

शिवसेनेचा दावा, कुर्ल्यात बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला

पुढील लेख
Show comments