Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पूनम पांडेने राज कुंद्राविरोधात केला फौजदारी गुन्हा दाखल

Webdunia
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (16:19 IST)
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. अभिनेत्री पूनम पांडेने राज कुंद्रा आणि त्याच्या सहकार्‍यांविरोधात फौजदारी खटला दाखल केला आहे. सुरुवातीला पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेण्यास नकार दिला. यानंतर पूनमने उच्च न्यायालयाची  मदत घेण्याचे ठरवले तर कुंद्राने स्पष्टीकरण देताना डिसेंबर 2019 मध्ये त्याने संबंधित कंपनी सोडल्याचे म्हटले.
 
जगभरातून सध्या पूनमला अनेक निनावी फोन येत आहेत. या फोन कॉलमुळे पूनम पूर्णपणे वैतागली आहे. एवढेच नाही तर गेल्या वर्षी जून महिन्यात एक टॅगलाइन (कॉल मी, आय स्ट्रिप फॉर यू ) तिच्या  अ‍ॅपवर लीक झाली होती. पूनच्या मते, तिचे अ‍ॅप राज कुंद्राची कंपनी चालवत होती..
 
एका महिन्यातच  कुंद्राच्या कंपनीसोबतचा अ‍ॅपचा करार पूनमने संपवला होता. मात्र करार संपूनही तिचा अ‍ॅप सक्रिय ठेवण्यात आला. पूनच्या तक्रारीनुसार या नंतर तिला निनावी फोन येऊ लागले.
 
कंपनीला दिली होती माहिती
मुलाखतीत पूनम पांडे म्हणाली की, मार्च 2019 मध्ये माझ्या नावाचे अ‍ॅप सुरू करण्यासाठी मी  कंपनीकडे मदत मागितली होती. अ‍ॅपच्या माध्यमातून मिळणार्‍या कमाईचा पैसा किती भागीदारी असेल यावरही आमचे बोलणे झाले होते. मात्र नंतर मला हा करार चुकीच्या पद्धतीने झाल्याचे वाटले.
 
पांडे म्हणाल्या की, करार संपला तरीही माझे फोटो आणि व्हिडीओ अ‍ॅपवर टाकले गेले. एवढेच नाही तर माझ्या खासगी नंबरवरून अश्लील मेसेजही पाठवले गेले. ते मेसेज पाहून मला हजारो फोन आले. या सर्वामुळे माझे जगणे असह्य झाल्याने कंपनीच्या विरोधात जाण्याचा निर्णय मला घ्यावा लागला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

ब्राझीलमध्ये घराच्या चिमणीला विमान धडकले,10 जणांचा मृत्यू

ठाण्यात बेकायदेशीर वास्तव्यासाठी 1 महिलेसह 8 बांग्लादेशींना अटक

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर, या दिवशी भारत-पाकिस्तान मेगा मॅच होणार

धक्कादायक : ठाण्यामध्ये न्यायालयात आरोपीने न्यायाधीशांवर चप्पल फेकली

LIVE: ओला कॅब चालकाच्या हत्येप्रकरणी दोन भावांना अटक

पुढील लेख