Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बदलापुर : शाळेत नर्सरीतील मुलींचे लैंगिक शोषण, मुख्याध्यापक निलंबित तर शिक्षक बडतर्फ, पोलीसाला काढून टाकले

Webdunia
मंगळवार, 20 ऑगस्ट 2024 (12:30 IST)
मुंबई मधील ठाणे जिल्ह्यातील बदलापुर मधील एका शाळेमध्ये दोन छोट्या लहान मुलींसोबत यौन शोषणचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेला घेऊन स्थानीय नागरिकांनी आज मंगळवारी बदलापुर शहर बंद ठेबण्याचे आह्वान केले आहे. सकाळी शेकडो लोक शाळेबाहेर जमा झालेत. व शाळा आणि पोलिसानं विरोधात घोषणाबाजी केली.
 
मिळालेल्या माहितीनुसार आरोप आहे की, बदलापुर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी आलेल्या पीडित मुलींच्या आईवडिलांना 12 तास बसवून ठेवत वाट पाहायला लावली. यामुळे लोकांना राग अनावर झाला. 
 
बदलापुर मधील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये करारावर ठेवण्यात आलेल्या सफाई कर्मचारीने साडे तीन वर्षांच्या दोन चिमुकलींचे टॉयलेट मध्ये यौन शोषण केले. याबद्दल 24 वर्षीय आरोपीला शनिवार अटक करण्यात आली आहे. सांगितले जाते आहे की, आरोपी 1ऑगस्टपासून शाळेमध्ये साफसफाईचे काम करीत होता. तसेच तो मुलींना टॉयलेट मध्ये देखील घेऊन जायचा.
 
या प्रकरणामध्ये चार दिवसानंतर शाळा प्रशासन ने आपला पक्ष मांडला आणि सर्वांची सार्वजनिक स्वरूपाने माफी मागितली. यासोबतच शाळा प्रमुखांनी मुख्यध्यापकांना निलंबित केले आहे. तसेच वर्गशिक्षक आणि मदतनीस ला नौकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. तसेच ज्या कंत्राटदाराने आरोपींना पाठवले होते, त्या कंत्राटदारासोबतचा करारही शाळेने रद्द केला आहे.
 
हे प्रकरण तेव्हा समोर आले जेव्हा लहान चिमुकलीने आपल्या आजोबांना आरोपी द्वारा यौन शोषण करण्याबद्दल सांगितले. कुटुंबीयांनी या लहान मुलींना डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी मुलींसोबत लैंगिक शोषण झाल्याचे सांगितले. 
 
पोलिसांवर प्रश्न उपस्थित केल्यावर निरीक्षकाला काढण्यात आले-
तसेच पीडितेच्या आईवडिलांनी तक्रार केली की, पोलिसांनी त्यांना 12 तासांपेक्षा जास्त वाट पाहायला लावली. नंतर जिल्हा महिला व बालकल्याण विभागाने या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. लोकांचा संताप पाहता पोलीस प्रशासन ने बदलापूरच्या वरिष्ठ पोलीस इंस्पेक्टरला काढून टाकले आहे.  

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख