Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट...

Webdunia
मंगळवार, 31 मार्च 2020 (10:13 IST)
कोणत्याही प्रकारचा फॉर्म वितरीत करण्यात आलेला नाही. अन्न नागरी पुरवठा विभागाकडून खुलासा  
रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेला नाही. सद्या सोशल मिडिया व काही माध्यमावरून अशा प्रकारचा बनावट फॉर्म प्रसिद्ध केला जात आहे. त्यात काहीही तथ्य नसून असा कोणताही निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आलेला नसल्याने नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी असा कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आलेल्या खुलाश्यात म्हटले आहे की, सोशल मिडिया तसेच काही माध्यमातून रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत धान्य मिळण्यासाठी फॉर्म उपलब्ध करून देण्यात आल्याच्या बातम्या पसरविल्या जात आहे. सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्याने राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहणार नाही यासाठी शिवभोजन तसेच विविध योजना राज्याच्या अन्न ,नागरी पुरवठा विभाग व इतर विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या आहेत. मात्र सोशल मिडियाच्या माध्यमातून अर्ज व चुकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. अशा खोट्या बातम्यांमधून जनतेची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी राज्यसरकारकडून कुठलीही अधिकृत माहिती आल्याशिवाय कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबईत भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, तरुणाचा मृत्यू

Gas Cylinder:रेशनकार्ड धारकांना सरकार देत आहे 450 रुपयांना एलपीजी गॅस सिलिंडर

बटाट्यावरून वाद, वृद्ध महिलेवर हल्ला, नागपूरची घटना

दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव फायनल, सस्पेन्स आज संपणार?

जाधववाडी येथे ट्रकची दुचाकीला धडक, दोघे ठार

पुढील लेख
Show comments