Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोदी-मोदी म्हणणार्‍यांनो लाज बाळगा : सिसोदिया

Webdunia
शनिवार, 25 जून 2016 (11:19 IST)
भारताला अणुइंधन पुरवठादार गटात (एनएसजी) प्रवेश देण्यास काही देशांनी अप्रत्यक्षपणे विरोध केल्याच्या पाश्र्वभूमीवर आम आदमी पक्षाने मोदी-मोदी म्हणणार्‍यांनो जरा लाज बाळगा, अशा शब्दात सरकारवर निशाणा साधला आहे.
 
आम आदमी पक्षाचे नेते आणि राजधानी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शुक्रवारी टिटरद्वारे टीका केली आहे. जर पराभव झाला तर चीनचे कपट आणि जर विजय झाला असता तर? मोदी-मोदीचा जप केला असता. कूटनीतीच्या प्रदर्शनाला धक्का बसला आहे. 
 
काहीतरी लाज बाळगा, अशा शब्दात त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. एकामागोमाग केलेल्या टिटस्मध्ये त्यांनी पुढे म्हटले, झोपाळा झुलवून, बिर्याणी खाऊ घालून आणि दहा-दहा लाखाचा सूट घालून जागतिक मुत्सद्देगिरी चालत नाही. 
 
एनएसजीमधील देशाच्या पराभवाबद्दल राज्यांना अस्थिर करण्यामध्ये व्यस्त असलेल्या पीएमओला प्रश्न विचारला जावा का? असा प्रश्न सिसोदिया यांनी उपस्थित केला आहे.
 
सर्व पहा

नक्की वाचा

कांदिवली परिसरात तरुणाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

फडणवीसांनी दिला इशारा- शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देणाऱ्या बँकांविरुद्ध दाखल होईल FIR

मुंबईत बेस्ट बसने दुचाकीला उडवलं, चिमुकलीचा जागीच मृत्यू

राज्यातील 4 विधानपरिषदेसाठी मतदान आज

डकवर्थ-लुईस नियमाचे सह-निर्माते फ्रँक डकवर्थ यांचे निधन

पुढील लेख
Show comments