Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हिमाचल प्रदेश : भूस्खलनात ४६ जणांचा मृत्यू

46-dead-in-himachal-pradesh-landslide
Webdunia
सोमवार, 14 ऑगस्ट 2017 (09:23 IST)

हिमाचल प्रदेशमध्ये   ढगफुटीनंतर झालेल्या भूस्खलनात  ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावरून जाणा-या राज्य परिवहन मंडळाच्या दोन बसवर दरड कोसळल्याने त्यातील सर्व प्रवाशांवर आणि आसपासच्या घरांतील लोकांवर या दरडी कोसळल्या.  रात्री उशीरापर्यंत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांकडून मदतकार्य सुरू होते. बेपत्ता असलेल्यांची संख्या मोठी असल्याने मृतांची संख्या वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातात झालेल्या जीवित हानीबद्दल वेदना झाल्याचे टिष्ट्वटरवर म्हटले.

दरडी कोसळल्या व त्यामुळे मंडी-पठाणकोट राष्ट्रीय महामार्ग १५४ च्या कोत्रुपी खेड्यातील १०० मीटर भागाची हानी झाली. या महामार्गावरून एक बस मनाली येथून कटरा तर दुसरी चांभा येथून मनालीला निघाली होती. या दोन्ही बस हिमाचल प्रदेश राज्य परिवहन महामंडळाच्या होत्या. दरडी कोसळल्यामुळे रस्ता वाहून गेला व त्यामुळे बसगाड्या ८०० मीटर खोल दरीत कोसळल्या. एक बस तर दरडीखाली पूर्णपणे गाडली गेल्यामुळे तिचा रात्री उशीरापर्यंत शोध लागला नव्हता. या बसमध्ये तब्बल ५० प्रवासी होते. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments