Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हाथरसमध्ये सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरीत 60 लोक मृत्युमुखी, अनेक जखमी

Webdunia
मंगळवार, 2 जुलै 2024 (18:56 IST)
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सत्संग कार्यक्रमाच्या वेळेस झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अनेकजण मारले गेल्याची भीती आहे.उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये एका सत्संग कार्यक्रमाच्या वेळेस झालेल्या चेंगराचेंगरीत 60 भाविकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. बीबीसीचे पत्रकार दिलनवाझ पाशा यांना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
 
हाथरसचे पोलीस अधीक्षक निपुण अगरवाल म्हणाले की, अनेकजण यात जखमी देखील झाले आहेत.मृतांमध्ये 20 पेक्षा अधिक महिलांचा समावेश असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
 
एटाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजेश कुमार सिंह यांनी सांगितलं, "एक दुखद घटना घडली आहे. हाथरस जनपद मधील सिकंद्राराऊ जवळच्या मुगलगढी गावात भोले बाबांचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळेस झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये लोकांचा मृत्यू झाला आहे."
 
ते म्हणाले की, प्राथमिक तपासातून कळालं आहे की धार्मिक कार्यक्रमाच्या वेळेस झालेल्या चेंगराचेंगरीमुळे हे घडलं आहे.एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया व्यासपीठावर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयानं हाथरसमध्ये झालेल्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
 
त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हटलं आहे की, "जखमी लवकर बरे व्हावेत अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. जखमींना तत्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन योग्य ते उपचार करण्याच्या आणि घटनास्थळी वेगानं मदतकार्य करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 
 
मुख्यमंत्र्यांनी आग्र्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजी, आग्रा) आणि अलीगढचे आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली या दुर्घटनेची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत."
"सिकंद्राराऊ ट्रॉमा सेंटरमध्ये जखमींना नेण्यात येत आहे. एटाच्या हॉस्पिटलमध्ये 27 मृतदेह आले असून त्यात 23 महिला, तीन मुलं आणि एका पुरुषाचा मृतदेह आहे. जखमी अद्याप पोहोचायचे आहेत."
 
एटाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ, एटा) उमेश कुमार त्रिपाठी म्हणाले, "आतापर्यंत 27 मृतदेह पोस्ट मॉर्टम हाऊसमध्ये पोहोचले आहेत. यात 25 महिला आणि दोन पुरुष आहेत. अनेक जखमींना देखील दाखल करण्यात आलं आहे. चौकशीनंतर पुढील माहिती दिली जाईल."
बीबीसीचे सहकारी पत्रकार धर्मेंद्र चौधरी यांनी ट्रॉमा सेंटरमधून काही व्हीडिओ पाठवले आहेत. त्यामध्ये मृतांचे कुटुंबीय आक्रोश करताना दिसत आहेत.
 
ट्रॉमा सेंटरमध्ये असलेल्या मृतांपैकी एकाचा नातेवाईक म्हणाला, "इतकी मोठी दुर्घटना घडली आहे. मात्र एकही वरिष्ठ अधिकारी इथे पोहोचलेला नाही. भोले बाबांना इथे एवढा मोठा कार्यक्रम करण्याची परवानगी कोणी दिली होती. प्रशासन कुठे आहे?"
 
जखमी आणि मृतांना ट्रॉमा सेंटरमध्ये ट्रक, टेम्पो आणि अॅम्ब्युलन्सद्वारे आणण्यात आलं.व्हीडिओमध्ये ट्रॉमा सेंटरच्या बाहेर महिलांचे मृतदेह फरशीवर ठेवलेले दिसत आहेत.ट्रॉमा सेंटरच्या बाहेर गोंधळाचं वातावरण आहे आणि लोक आपल्या नातेवाईकांच्या शोधात तिथे येत आहेत.
 
दरम्यान उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री संदीप सिंह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की "मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हाथरसमधील घटनास्थळी जाण्याच्या आणि सरकारकडून आवश्यक निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मृतांची संख्या सातत्यानं वाढते आहे."
 
Published By- Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments