Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अद्याप 'या' खासदारांनी संपत्तीची घोषणा केलेली नाही

Webdunia
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 (16:15 IST)
आतापर्यंत लोकसभेचे ६५ खासदार आणि राज्यसभेच्या २९ खासदारांनी आपली संपत्ती किंवा कर्जाची घोषणा केलेली नाही. माहिती अधिकारांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीमुळे ही बाब उजेडात आली आहे. लोकसभेतील ६१ खासदारांनी २०१४ पासून आपल्या संपत्तीची घोषणा केलेली नाही. यामध्ये ४ जण पोटनिवडणुकीत निवडून आलेले आहेत. यातील ४ खासदार हे काँग्रेस तर ७ जण हे टीडीपीचे खासदार आहेत. तर तृणमूल काँग्रेस, बिजद, भाजपा, सपा, टीआरएस आणि एलजेएसपीसारख्या पक्षांचे ४-४ खासदार आहेत. तर आपचे ३, शिवसेना आणि आरजेडी, अकाली दल, जेडीयू आणि जेएमएमच्या २-२ खासदारांचा यात समावेश आहे. एआयडीएमके, वायएसआर, आयएएलडी, एनपीपी, एनसीपी, एनडीपीपी आणि इतर पक्षातील १-१ खासदारांचाही यात समावेश आहे.
 
सोबतच २९ असे राज्यसभा खासदार आहेत ज्यांनी आपल्या संपत्तीची विस्तृत माहितीच दिलेली नाही. यामध्ये ६ काँग्रेस आणि ६ भाजपाचे सदस्य आहेत. तर आरजेडी, एआयटीसी आणि टीआरएसच्या ३-३ खासदारांचा समावेश आहे. बिजद आणि जेडीयू या दोन्ही पक्षातील २ खासदारांनी आपल्या संपत्तीची विस्तृत माहिती दिलेली नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments