Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून खुशखबर, महागाई भत्ता होळीपूर्वी वाढणार !

Webdunia
रविवार, 5 फेब्रुवारी 2023 (16:59 IST)
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. केंद्र सरकार कडून होळीच्या पूर्वी एक कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची शक्यता आहे.  केंद्र सरकार सध्याच्या 38 टक्क्यांवरून 42 टक्क्यांपर्यंत महागाई भत्ता वाढवू शकते. या सूत्रानुसार महागाई भत्ता पूर्ण 4 टक्के वाढण्याची शक्यता आहे. 
 
दरवर्षी 1 जानेवारी आणि 1 जुलैपासून केंद्र सरकारच्या माध्यमातून महागाई भत्ता वाढवण्याचा नियम सुरू आहे. यंदा केंद्र सरकार सध्या मिळणाऱ्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करू शकते आणि असे झाले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्तामध्ये  थेट 4 टक्क्यांनी वाढ होणार आहे.  
 
केंद्र सरकार आपल्या एक कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता सध्याच्या 38 टक्क्यांवरून 42 टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे.
 कामगार आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता दर महिन्याला कामगार ब्युरोने जारी केलेल्या औद्योगिक कामगारांसाठी (CPI-IW) ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे मोजला जाणारा महागाई भत्ता साठी एकसूत्रावर एकमत झाले आहे. लेबर ब्युरो हा कामगार मंत्रालयाचा एक भाग आहे.
 
ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितले की , डिसेंबर 2022 साठी सीपीआय-आयडब्ल्यू जारी करण्यात आला होता. सध्या DA 2016 मध्ये चार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.यंदा महागाई भत्ता सध्याच्या  38 टक्क्यांवरून 42 टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. ते म्हणाले की, वित्त मंत्रालयाचा खर्च विभाग DA वाढविण्याचा प्रस्ताव तयार करेल. हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवला जाईल. 1 जानेवारी 2023 पासून महागाई भत्त्यात वाढ लागू होईल.

Edited By - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments