Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मानवी तस्करीचा संशय असलेलं विमान 276 प्रवाशांसह फ्रान्सवरून मुंबईत पोहोचलं

Webdunia
मंगळवार, 26 डिसेंबर 2023 (10:15 IST)
303 भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारे एअरबस A340 हे विमान मुंबई विमानतळावर पोहोचलं आहे.
मानवी तस्करीच्या संशयावरून हे विमान फ्रान्समधील व्हॅट्री विमानतळावर उतरवण्यात आलं होतं. संयुक्त अरब अमिरातीहून निकारागुआची राजधानी मॅनागुआला हे विमान जात होते.
 
एकूण 303 पैकी 276 प्रवासी घेऊन विमान मुंबईत पोहोचलं आहे. उर्वरीत 25 जणांनी फ्रान्समध्ये आश्रयासाठी अर्ज केला असून, यात दोन अल्पवीयनही आहेत. तसंच, दोन संशयित तस्कर पुढील तपासाच्या दृष्टीने फ्रान्समध्येच आहेत. मात्र, कोर्टाने त्यांना सध्या मुक्त केलं आहे.
 
या 303 प्रवाशांपैकी अनेकजण भारतीय नागरिक आहेत. यातील एक तृतीयांश प्रवासी गुजरात राज्यातील आहेत.
'हे' 3 प्रश्न अद्याप अनुत्तरीतच
1) या भारतीय नागरिकांकडे आवश्यक व्हिसा डॉक्युमेंट्स आणि परवानग्या होत्या का? ज्या आर्थी त्यांना परत भारतात डिपोर्ट केलं आणि निकारागुआला पुढे जाऊ दिलं नाही त्याआधी त्यांच्याकडे हे डॉक्युमेंट्स नव्हते का?
 
2) जर फ्रान्स सरकारने त्यांना चौकशी करून सोडून दिलं तर मानवी तस्करीचा आरोप चुकीचा होता का?
 
3) या भारतीय नागरिकांची आर्थिक फसवणूक झाली का आणि त्यांना कोणत्या आमिषानं अमेरिकेत नेलं जात होतं का? याची चौकशी कोणती भारतीय तपास यंत्रणा करते आहे का? याबाबत सरकारकडून कोणताही अधिकृत निवेदन नाही.
22 डिसेंबरला फ्रान्समधील मीडिया रिपोर्टनुसार हे विमान व्हॅट्री विमानतळावर उतरल्याची माहिती समोर आली आहे. एअरबस A340 हे विमान संयुक्त अरब अमिरातीहून निकारागुआची राजधानी मॅनागुआला जात होते.
 
या प्रवासादरम्यान गुरुवारी (21 डिसेंबर) विमानाचा पूर्व फ्रान्समधील व्हॅट्री विमानतळावर इंधन भरण्यासाठी एक थांबा होता. त्याचवेळी या विमानातून मानवी तस्करी होत असल्याची पोलिसांना निनावे टीप मिळाली.
 
या कारवाईनंतर अनेक प्रवाशांना विमानतळावरच बंदिस्त करून ठेवण्यात आले होते.
 
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे लोक कोणत्या कारणासाठी आणि कशासाठी प्रवास करत होते? तसंच त्यांच्या ओळखपत्रांची कसून चौकशी सुरू आहे.
 
फ्रान्समधील संघटित गुन्हेगारी विरोधी पथक (JUNALCO) या प्रकरणाची चौकशी करत आहे.
 
प्राथमिक माहितीनुसार या विमानातील काही प्रवासी हे ‘बेकायदेशीर स्थलांतरित’ असल्याच सांगण्यात येत आहे.
 
विमानतळाच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रवाशांना सुरुवातीला विमानातच राहण्याची परवानगी देण्यात आली होती, पण नंतर विमानतळाच्या लाऊंजचे बेडसहित व्यवस्था करण्यात आली.
 
फ्रान्समध्ये मानवी तस्करी प्रकरणात दोषी आढळल्यास 20 वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो.
हे विमान रोमानियन चार्टर कंपनी लीजेंड एअरलाइन्सच्या मालकीचे आहे.
 
या कंपनीच्या वकिलांनी AFPला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने यात कोणताही गुन्हा केलेला नाही आणि ते फ्रेंच अधिकार्‍यांशी या तपासात पूर्ण सहकार्य करत आहेत.
 
Flightradar या वेबसाईटनुसार या कंपनीची एकूण 4 विमाने आहेत.
 
भारताने काय म्हटलं?
दरम्यान, या घटनेवर फ्रान्समधील भारतीय दूतावासाने प्रतिक्रिया दिली आहे.
 
सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, "दुबईहून निकारागुआकडे जाणाऱ्या विमानाला फ्रान्समध्ये थांबवण्यात आले आहे. यातील 303 प्रवाशांपैकी बहुतेक लोक हे भारतीय वंशाचे आहेत, असं फ्रान्स सरकारने आम्हाला सांगितल आहे."
 
तसंच, भारतीय दूतावासाची एक टीम संबंधित विमानतळावर पोहोचली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला आमचं प्राधान्य राहील, असंही भारतीय दूतावासाने म्हटलं आहे.
 
Published By- Priya Dixit
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

पुढील लेख
Show comments