Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Tirupati Laddu Case:तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादात भेसळ,सीएम चंद्राबाबू नायडूंचं मोठं वक्तव्य, म्हणाले- 'कोणालाही सोडणार नाही

Webdunia
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024 (17:51 IST)
जगप्रसिद्ध तिरुपती व्यंकटेश्वर मंदिराच्या प्रसादात भेसळ झाल्याची पुष्टी झाल्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आरोपींवर कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे. तिरुपती येथील प्रसिद्ध श्री व्यंकटेश्वर मंदिरात प्रसाद म्हणून लाडू वाटप करण्यात येतात. या लाडवाच्या प्रसादात लाडू बनवण्यासाठी बीफ फॅट, फिश ऑईल आणि पाम ऑइलचा वापर केला जात असल्याचा दावा राज्यातील सत्ताधारी टीडीपीने केला आहे. मात्र, लॅबचा अहवालही आला असून, याला पुष्टी दिली आहे. 

भगवान तिरुपती बालाजीचा प्रसिद्ध प्रसाद लाडू बनवण्यात भेसळ केल्याच्या मुद्द्यावरून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे वक्तव्यही समोर आले आहे. या गैरप्रकारात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सोडले जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल,असे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले.

मला मिळालेल्या प्रयोगशाळेच्या अहवालावरून प्रसादाच्या दर्जात तडजोड झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यात अशुद्ध वस्तूंची भेसळ उघडकीस आली आहे. या सर्व प्रकाराला जबाबदार असलेल्या काही लोकांवर कारवाईही सुरू झाली आहे. काही लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

या संदर्भात अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. घटनेशी संबंधित पुरावे गोळा केले जात आहेत. या गैरप्रकारात कोणाचाही सहभाग आढळून येईल, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले. 

टीडीपीचे प्रवक्ते अनम वेंकट रमण रेड्डी यांनी गुरुवारी कथित प्रयोगशाळेचा अहवाल दाखवला, ज्याने दिलेल्या तुपाच्या नमुन्यात “बीफ फॅट” असल्याची पुष्टी केली.अहवालात नमुन्यांमध्ये “लार्ड” (डुकराच्या चरबीशी संबंधित) आणि फिश ऑइलचाही दावा करण्यात आला आहे.
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

पुढील लेख
Show comments